आजी-माजी गृहमंत्र्यांची गुप्तभेट! वळसे-पाटील आणि अनिल देशमुखांमध्ये काय चर्चा?

आज आजी-माजी गृहमंत्र्यांची गुप्तभेट झाल्याची माहिती समोर आलीय. वळसे-पाटील हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत, तेव्हा ही भेट झाल्याचं बोललं जातंय.

आजी-माजी गृहमंत्र्यांची गुप्तभेट! वळसे-पाटील आणि अनिल देशमुखांमध्ये काय चर्चा?
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 10:34 PM

नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीच्या टार्गेटचा आरोप केल्यानंतर देशमुख यांना पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर देशमुखांच्या जागी शरद पवार यांचे सर्वात विश्वासू सहकारी असलेल्या दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राज्याच्या गृहखात्याचा कारभार देण्यात आला. आज आजी-माजी गृहमंत्र्यांची गुप्तभेट झाल्याची माहिती समोर आलीय. वळसे-पाटील हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत, तेव्हा ही भेट झाल्याचं बोललं जातंय. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Dilip Walse-Patil and Anil Deshmukh meet in Nagpur, details of the meeting are secret)

वळसे-पाटील हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल ते नागपुरात दाखल झाले. त्यानतंर वाशिम जिल्ह्यातील आपला नियोजित दौरा आटोपून ते रात्री पुन्हा नागपुरात आले. तेव्हा मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास अनिल देशमुख वळसे-पाटील यांच्या भेटीला पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. रवी भवन या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये साधारण 1 तास चर्चा झाली. या भेटीचा तपशील समजू शकला नसला तरी देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

‘राजकीय हेतू पोटी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम सुरु’

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात ईडीने ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल केला आहे. त्या अनुषंगाने ईडीने आता तपास सुरु केला आहे. याबाबत मला मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळत असल्याचं देशमुख म्हणाले. मागच्या काळात CBIच्या माध्यमातून चौकशी झाली. आता ED च्या माध्यमातून होणार. राजकीय हेतू पोटी मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम सध्या सुरु असल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय.

आपण गृहमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरणात कारवाई केली. तसंच CBIला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्याची मुभा होती. त्यावर निर्णय घेऊन राज्यात सरकारच्या परवानगी शिवाय चौकशी करण्यास बंदी घालण्यात आली. दादरा नगर हवेलीच्या खासदार आत्महत्या प्रकरण मी विधानसभेत मांडलं. त्यामुळे केंद्र सरकार नाराज असू शकतं, म्हणून माझी चौकशी करत असावेत, असा टोला देशमुख यांनी लगावलाय.

नेमकं प्रकरण काय?

निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल.

देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.

संबंधित बातम्या :

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल; घर, कार्यालयासह 10 ठिकाणी सीबीआयची छापेमारी

Anil Deshmukh:आगामी काळ अनिल देशमुखांसाठी कठीण असेल; भाजप नेत्याचे सूचक वक्तव्य

Dilip Walse-Patil and Anil Deshmukh meet in Nagpur, details of the meeting are secret

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.