AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप कर्नाटक सरकार पाडण्याच्या तयारीत, सूत्र मुंबईतून हलणार?

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला काठावर यश मिळालं. काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत सोबत घेतलं आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. भाजपचे नेते बीएस येदीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. पण त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करता आलं नाही. आता भाजप लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि जेडीएस सरकार पाडण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती आहे. काही वृत्तांनुसार, सरकार […]

भाजप कर्नाटक सरकार पाडण्याच्या तयारीत, सूत्र मुंबईतून हलणार?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला काठावर यश मिळालं. काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत सोबत घेतलं आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. भाजपचे नेते बीएस येदीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. पण त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करता आलं नाही. आता भाजप लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि जेडीएस सरकार पाडण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती आहे.

काही वृत्तांनुसार, सरकार पाडण्याच्या हालचाली मुंबईतून होण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसचे भाजपच्या संपर्कात असलेले आमदार मुंबईतील एका हॉटेलात लपवण्यात आले आहेत. विविध हॉटेलांचं नाव सांगण्यात येत आहे. कारण, आमदार नेमके कोणत्या हॉटेलात आहेत हे समजू नये हा यामागचा उद्देश आहे.

कर्नाटकमधील काँग्रेसचे दहा आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. यापैकी चार जण मुंबईत आहेत. महाराष्ट्राला लागून असलेल्या मतदारसंघातील दोन आमदारही यात आहेत. या चार आमदारांच्या संपर्कात आणखी सहा ते सात आमदार आहेत. आमचे आमदार मुंबईत फिरायला गेलेत, असं काँग्रेसकडून कर्नाटकात सांगण्यात येत आहे.

कर्नाटकात या वृत्तांनंतर राजकीय अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आमच्या सरकारला कोणताही धोका नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सांगितलंय. भाजपनेही घोडेबाजाराच्या वृत्तांचं खंडण केलंय. पण सूत्रांच्या मते, येत्या चार दिवसात कर्नाटकमध्ये भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.

भाजपचे आमदार दिल्लीत

कर्नाटकातील भाजपच्या 104 पैकी 101 आमदार दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकची आढावा बैठक सुरु असल्याचं सांगितलं जातंय. काँग्रेसच्या आमदारांना जसा धोका आहे, तसाच धोका भाजपच्या आमदारांना असल्याचं सांगितलं जातंय. म्हणूनच भाजपनेही खबरदारी घेतली आहे.

कर्नाटकातील पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत, तर एक नामांकित सदस्य आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस 80 जेडीएस 37, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष अशा 120 आमदारांसह सध्या काँग्रेस-जेडीएसची सत्ता आहे. भाजपचे 104 आमदार निवडून आले होते. त्यामुळे भाजपला आणखी किमान दहा आमदारांची आवश्यकता आहे. आपल्याला 120 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचं कुमारस्वामींनी म्हटलंय.

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.