AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC Election 2022 Ward 32 : पुणे महापालिका वॉर्ड 32 मध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत राहणार कि खिंडार पडणार? जाणून घ्या वॉर्डमधील सध्याची स्थिती

मागील निवडणुकीत या वॉर्डमध्ये चारही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. यंदा हा बालेकिल्ला राष्ट्रवादीच्याच ताब्यात राहतो कि राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाचा येथील निवडणुकीवर परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

PMC Election 2022 Ward 32 : पुणे महापालिका वॉर्ड 32 मध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत राहणार कि खिंडार पडणार? जाणून घ्या वॉर्डमधील सध्याची स्थिती
पुणे महापालिकाImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 26, 2022 | 12:48 AM
Share

पुणे : महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जवळ येऊन ठेपल्या आहेत. यात नगरपरिषद, नगरपालिका, महापालिकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे राज्याच्या राजकारणात अधिक महत्व असलेल्या मुंबई, पुणेसारख्या महापालिका देखील निवडणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. पुणे महापालिके (Pune Municipal Corporation)च्या यंदाच्या निवडणुकीत एकूण 58 वॉर्ड असणार आहेत. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार नोंद झालेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक (Election) होणार आहेत. या निवडणुकीत तीन सदस्यांचे 57 वॉर्ड तर दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 वॉर्ड (Ward) असणार आहेत. नव्या प्रभागरचनेत एकूण 173 नगरसेवक असतील. वॉर्ड क्रमांक 32 मधील (सुतारदरा – भुसारी कॉलनी) निवडणूक पुणे महापालिकेच्या एकूण राजकीय समीकरणावर प्रभाव पडणारी असेल. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष या वॉर्डकडे विशेष लक्ष ठेवून असणार आहेत. हा वॉर्ड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मागील निवडणुकीत या वॉर्डमध्ये चारही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. यंदा हा बालेकिल्ला राष्ट्रवादीच्याच ताब्यात राहतो कि राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाचा येथील निवडणुकीवर परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पुणे महापालिका वॉर्ड 32 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

वॉर्डमधील एकूण लोकसंख्या – 67127 अनुसूचित जाती – 6582 अनुसूचित जमाती – 471

वॉर्डची हद्द कोठून कुठपर्यंत

सुतारदरा – भुसारी कॉलनी या वॉर्ड क्रमांक 32 ची हद्द पंडित भीमसेन जोशी उद्यानपासून नवभूमी, शास्त्रीनगर पार्ट, बावधन खुर्द, जिजाईनगर, वृंदावन सोसायटी, इंदिराशंकर नगरीपर्यंत हद्द आहे. यामध्ये नव्या प्रभागरचनेनुसार, भुसारी कॉलनी, सुतारदरा, पंडित भीमसेन जोशी उद्यान, नवभूमी, वृंदावन सोसायटी, इंदिरा शंकर नगरी या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

पुणे महापालिका वॉर्ड 32 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

यंदाचे आरक्षण

यंदाच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या आरक्षणानुसार वॉर्ड क्रमांक 32 चा ‘क’ भाग सर्वसाधारण गटासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

2017 च्या निवडणुकीत विजयी झालेले अर्थात सध्याचे नगरसेवक

अ. दिलीप प्रभाकर बराटे (Dilip Prabhakar Barate) (राष्ट्रवादी काँग्रेस) ब. सायली रमेश वांजळे (Sayali Ramesh Vanjale) (राष्ट्रवादी काँग्रेस) क. दिलीप प्रदीप धुमाळ (Dipali Pradip Dhumal) (राष्ट्रवादी काँग्रेस) ड. सचिन शिवाजी दोडके (Sachin Shivaji Dodake) (राष्ट्रवादी काँग्रेस)

पुणे महापालिका वॉर्ड 32 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

राज्याच्या सत्तेत नुकताच मोठा भूकंप घडला आहे. हा भूकंप भाजपने घडवला आणि शिवसेनेसह महाविकास आघाडीला मोठा हादरा दिला. या बदललेल्या राजकीय समीकरणाचा प्रभाव जर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दिसला तर वॉर्ड क्रमांक 32 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वर्चस्वाला धक्का लागू शकतो. त्यामुळे या वॉर्डच्या निवडणुकीकडे पुण्यासह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा