AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार म्हणाले शेती-उद्योग करा, जय पवारची विधानसभेच्या तोंडावर मोठी घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar Son Jay Pawar) यांनी मुलांना राजकारणात न येता शेती किंवा उद्योग व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता.

अजित पवार म्हणाले शेती-उद्योग करा, जय पवारची विधानसभेच्या तोंडावर मोठी घोषणा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 07, 2019 | 11:53 AM
Share

बारामती (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar Son Jay Pawar) यांनी मुलांना राजकारणात न येता शेती किंवा उद्योग व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता. अजित पवारांचा हा सल्ला त्यांचा लहान मुलगा जय पवारने (Ajit Pawar Son Jay Pawar)  चांगलाच मनावर घेतल्याचं दिसत आहे. जय पवारने मी राजकारणात आलो तरी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली आहे. जय पवारने टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

जय पवार सध्या बारामतीत प्रचारात व्यस्त आहे. वडील अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा जय पवार सांभाळत आहे. जय पवारच्या उपस्थितीत बारामती शहरात काल पदयात्रा काढून  अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जय पवारने आपण राजकारणात आलो तरी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं. “तीन चार वर्षापासून माझ्या राजकारणाच्या प्रवेशाची चर्चा सुरु आहे. जरी मी राजकारणात उतरलो तरी मी पक्षाचं कोणतं तरी पद घेऊन, सामान्य माणसांसाठी काम करेन, पण मी कोणतीही निवडणूक लढणार नाही” असं जय पवारने सांगितलं.

पवार कुटुंबियांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. शरद पवार यांना नाहक गोवलं जातंय. पवारांना राजकीय महत्व असल्यानं सत्ताधारी खेळी करत असल्याचा आरोप जय पवारने केला.

अजित पवारांचा मुलांना सल्ला

दरम्यान, अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते अज्ञातस्थळी गेले होते. त्यांचा कुणाशीही संपर्क नव्हता. केवळ त्यांनी मुलगा पार्थशी फोनवरुन संवाद साधून राजकारणात न आलेलं बरं, राजकारणाऐवजी व्यवसाय केलेला बरा, असा सल्ला दिला होता. तीच माहिती शरद पवारांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.

शरद पवार म्हणाले होते, “लढाई सोडण्याचा अजित पवारांचा स्वभाव नाही, माझ्यावर कारवाई झाली म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला. कधीही नोटीस न आलेल्या काकांनाही (शरद पवारांना) नोटीस आली, त्यामुळे राजकारणात न आलेलं बरं, राजकारणाऐवजी व्यवसाय केलेला बरा, असा सल्ला अजित पवारांनी मुलाला सल्ला दिला.”

अजित पवारांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar resigns ) यांनी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा (Ajit Pawar resigns ) राजीनामा मंजूर केला. अजित पवारांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती हरिभाऊ बागडे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

संबंधित बातम्या  

वडिलांचा राजीनामा, अजित पवारांचा धाकटा मुलगा पूरग्रस्त दौऱ्यावर, जय पवार म्हणतात….  

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...