“अमित शाह संरक्षणमंत्री झाल्यास पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल”

मुंबई : महायुतीत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेचा भाजपबाबतचा विरोधीस्वर अचानक बदलला. आता तर सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान करत शिवसेनेचे मुखपत्र सामनात अग्रलेखांचा सपाटाच लावला आहे. आजच्या अग्रलेखात शिवसेनेने मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. अमित शाह यांना संरक्षण खात्याचे मंत्रीपद मिळाल्यास पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल, असा दावा …

“अमित शाह संरक्षणमंत्री झाल्यास पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल”

मुंबई : महायुतीत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेचा भाजपबाबतचा विरोधीस्वर अचानक बदलला. आता तर सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान करत शिवसेनेचे मुखपत्र सामनात अग्रलेखांचा सपाटाच लावला आहे. आजच्या अग्रलेखात शिवसेनेने मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. अमित शाह यांना संरक्षण खात्याचे मंत्रीपद मिळाल्यास पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल, असा दावा सामनातून करण्यात आला.

सामनात लिहिले आहे, “अमित शाह हे कोणते खाते स्वीकारतात? गृह खाते की संरक्षण खाते? अरुण जेटली यांनी निवृत्ती पत्करल्यामुळे अर्थ खात्यास शहा यांचे नेतृत्व मिळतेय का हे पाहण्यासारखे आहे. शहा यांनी संरक्षण खाते स्वीकारले तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल असा लोकांचा विश्वास आहे. त्यांनी गृह खाते स्वीकारले तर अयोध्येत राममंदिर सहज उभे राहील. शिवाय काश्मीरमध्ये 370 कलम हटविण्याची घोषणा त्यांनी केली आहे, त्या कार्यास गती मिळेल.”

‘नक्षलवाद आणि माओवाद्यांचा हिंसाचार मोडून काढला जाईल’

या अग्रलेखात समान नागरी कायदा, नक्षलवाद, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा सर्वच विषयावर अमित शाह कसे उपयायोजना करतील याचेही वर्णन केले आहे. “समान नागरी कायदा लागू व्हावा अशी अमित शाह यांची इच्छा होतीच. देशभावनासुद्धा तिच असल्याने समान नागरी कायद्याबाबतचे वीर सावरकरांचे स्वप्नही साकार होईल. नक्षलवाद आणि माओवाद्यांचा हिंसाचार मोडून काढला जाईल.” शाह हे अर्थमंत्री झाले, तर विकासकामांना आणि आर्थिक सुधारणांना गती मिळेल. शेतकरी आणि कष्टकऱ्यांना लाभ मिळतील. तसेच शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या प्रयत्नांना गती मिळेल, असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले. तसेच ‘डॉलर’च्या तुलनेत रुपयाची घसरण रोजच सुरू आहे. त्या घसरणीस खो बसेल, असाही दावा करण्यात आला.

मोदी सरकारमध्ये आता सुषमा स्वराज, सुरेश प्रभू दिसत नाहीत याचीही नोंद सामनात घेण्यात आली. तसेच मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे असे म्हणत काम न केल्यास अमित शहा यांचा चाबूक मंत्रिमंडळात असल्याचेही शिवसेनेने सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *