फडणवीसांनी हिंमत असेल तर दिल्ली एअरपोर्टचे त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज दाखवावे, रोहित पवार म्हणाले अन्यथा…
व्ही. के. सिंग यांनी देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली विमानतळावर भेट घेतली होती. त्या रात्रीचे दिल्ली विमानतळावरच सीसीटीव्ही फूटेज त्यांनी हिंमत असेल तर दाखवून निर्दोषत्व सिद्ध करावे असे चॅलेंज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहे.

अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूचे गुढ वाढतच चालले आहे. या २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या या विमान अपघाताला नऊ महिने पूर्ण झाले तरी एफआयआर दाखल झाली नसल्याचे सांगत आज शरद पवार यांचे नातू राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी पुन्हा विमान अपघाताचे प्रेझेटेंशन सादर करत नवे आरोप केले आहेत.
रोहित पवार यांनी गेले अनेक दिवस या विमान कंपनी आणि कंपनीच्या मालकाला वाचवणाऱ्या मफलर मॅनचा खुलासा मी करणार असल्याचे सांगत वातावरण तापवले होते. आज त्यांनी या प्रकरणात एक फोटो सादर करुन तो मफलर मॅन आणखी कोणी नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे जाहीर करुन सर्वांना धक्का दिला आहे. या वेळी रोहित पवार यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांनीच अपघात घडवल्याचे म्हणत नाही. परंतू ते व्हीएसआर या विमान कंपनीला वाचवत असल्याचा दावा केला. दरम्यान, रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची व्ही.के. सिंग सोबत दिल्लीच्या एअरपोर्टवर रात्री भेट झाली. देवेंद्र फडवणीस यांनी हिंमत असेल दिल्लीच्या एअरपोर्टची सीसीटीव्ही दाखवावे असे आव्हानही रोहित पवार यांनी दिले आहे.
यावेळी व्ही. के. सिंह आणि व्हीएसआरला वाचवणारे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, असंही ते म्हणाले. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र, अजितदादांच्या अपघातामागे किंवा घातपातामागे फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा संबंध नसावा, असं मतही रोहित पवार यांनी व्यक्त केलं. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या फोटोतील व्यक्ती आणि अजित पवार यांच्या अपघाताचा थेट संबंध असल्याचा दावा त्यांनी केलेला नाही.
व्ही. के. सिंग यांच्या जवळचे संबंध मुख्यमंत्री यांचे आहेत. निवडणूक असतानाही ते लग्नाला गेले होते. फोटोत सोबत राघव शर्मादेखील आहे. त्यामुळे कारवाई होत नाही, असा आरोपही रोहित पवारांनी केला. दिल्लीत रजत शर्माच्या मुलाच्या लग्नाला देवेंद्र फडणवीस गेले होते. त्यावेळी एअरपोर्ट दिल्ली रात्रीच्या १० ते ११ दरम्यान व्ही.के.सिंग त्यांना भेटला होता. त्यावेळी व्ही.के.सिंग यांनी फडणवीस यांना एक फाईल दिली होती हवे तर दिल्ली एअरपोर्टचे सीसीटीव्ही तपासा असे रोहित पवार म्हणाले.
