AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुष्यबाण शिंदे गटाला गेलं तर? उद्धव ठाकरे गटाचा प्लॅन B काय? तयारी सुरू?

येत्या 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर यासंबंधी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. 

धनुष्यबाण शिंदे गटाला गेलं तर? उद्धव ठाकरे गटाचा प्लॅन B काय? तयारी सुरू?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 14, 2023 | 8:45 AM
Share

मुंबईः महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष (Maharashtra Politics) आता अंतिम टप्प्यात आल्याची चिन्ह आहेत. येत्या काही दिवसात शिवसेना (Shivsena) कुणाची, धनुष्यबाण कुणाचा यावर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) शिक्कामोर्तब होईल. 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर यासंबंधी महत्त्वाची सुनावणी होणार आहे.  आतापर्यंत झालेले युक्तिवाद आणि भूतकाळातील खटल्यांचा दाखला घेतला तर धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. असं झालं तर उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान उभं ठाकेल. पण या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी ठाकरे गटाने प्लॅन बीची तयारी सुरु केल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात लागला तर दोन प्रकारे तयारी सुरु करण्यात आली आहे. एक म्हणजे ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देईल.

तर दुसरा प्लॅनसाठीही तयारी सुरू झाल्याचं सांगण्यात येतंय. पक्षासाठी निवडणूक चिन्ह आणि नाव ठरवण्याचा फैसला ठाकरे गट जनतेवर सोपवेल. लोकांच्या मतानुसार, पक्षाचं नवं चिन्ह आणि नाव निश्चित केलं जाईल.

तज्ज्ञांच्या मते, निवडणूक आयोगाने सादिक अली केसचा आधार घेतला तर एकनाथ शिंदे गटाकडून निर्णय लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाने या निकालानंतर काय करायचे, याचे नियोजन सुरु केल्याचं कळतंय.

सुप्रीम कोर्टातली सुनावणी कधी?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची महत्त्वाची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुरू आहे. शिवसेनेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई तसेच राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार यासंबंधीच्या महत्त्वाच्या याचिकांवर ही सुनावणी सुरु आहे.

येत्या 14 फेब्रुवारी रोजी यासंबंधीची सुनावणी होणार आहे. तत्पुर्वी निवडणूक आयोगासमोर शिवसेना कुणाची हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत 55 पैकी 40 आमदारांना घेऊन गुवाहटी गाठलं होतं. त्यांच्यासोबत १० अपक्ष आमदारदेखील होते. एकनाथ शिंदेंच्या या ताफ्याने आधी सूरत आणि त्यानंतर गुवाहटी गाठलं होतं. यामुळे महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर झालं.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिली आणि त्यानंतर शिंदे-भाजप सरकार स्थापन केलं. दरम्यान शिवसेनेने गुवाहटीला गेलेल्या 16 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई केली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच