सतेज पाटील मोठ्या मनाने सांगत असतील, तर पालकमंत्रिपद स्वीकारेन : हसन मुश्रीफ

महाविकासआघाडीच्या पालकमंत्र्यांना यादी जाहीर झाली असली तरी कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची उत्सुकता अद्याप कायम (Kolhapur Guardian minister) आहे.

Kolhapur Guardian minister, सतेज पाटील मोठ्या मनाने सांगत असतील, तर पालकमंत्रिपद स्वीकारेन : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : महाविकासआघाडीच्या पालकमंत्र्यांना यादी जाहीर झाली असली तरी कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची उत्सुकता अद्याप कायम (Kolhapur Guardian minister) आहे. काँग्रेसचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाबाबत रस्सीखेच सुरु आहे. असे असताना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलं गेलं. मात्र थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद नाकारलं आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची नव्याने चर्चा सुरु झाली.

“मोठ्या मनानं सतेज पाटील सांगत असतील तर मी कोल्हापूरचं पालकमंत्रिपद स्वीकारायला तयार आहे. माझे मोठे भाऊच पालकमंत्री होतील असे सतेज पाटील म्हणतील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी “वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य असेल,” असं सांगत आपला दावा अजूनही सोडलेला नाही. यावरुन कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची रस्सीखेच सुरुच असल्याचे दिसत आहे.

महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार होताच अनेकांना पालकमंत्रिपदाची उत्सुकता लागली होती. मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी कोल्हापुरात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्री असे सांगत कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदावर आपला दावा सांगितला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती.

सतेज पाटील यांनी केलेल्या कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाच्या दाव्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आधीच पालकमंत्रिपदावरुन दोन्ही पक्षातील रस्सीखेच सुरु होती.

दरम्यान कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची रस्सीखेच नेहमीच राहिली आहे. ज्यात काँग्रेसने नेहमीच बाजी मारली. आघाडी सरकारच्या काळात पतंगराव कदम आणि त्यांच्यानंतर हर्षवर्धन पाटील हे कोल्हापूरचे पालकमंत्री राहिले आहेत. त्यामुळेच आताही काँग्रेसकडून पालकमंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील अंतर्गत कुरघोड्या टाळण्यासाठी आता काँग्रेसकडून विश्वजीत कदम यांचे नाव पुढ केलं जातं आहे.

पालकमंत्रिपदाचे महत्त्व दोन्ही पक्षांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनीही आपले प्रयत्न शेवटपर्यंत सुरु ठेवलेत. तर दुसर्‍या बाजूला शिवसेनेन देखील हे पालकमंत्रीपद काँग्रेसला देण्याचे संकेत देत राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्रिपदाची यादी पाहिल्यास पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे.. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या नकारानंतर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे जिल्ह्याचे लक्ष (Kolhapur Guardian minister) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *