भाजपची 2024 ला पुन्हा सत्ता आली तर…., जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य

देशात 2024 ला पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील, अशी भीती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे. | Jayant patil

भाजपची 2024 ला पुन्हा सत्ता आली तर...., जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य
जयंत पाटील
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 6:54 AM

जळगाव : देशात 2024 ला पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील, अशी भीती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे. तसंच कामगारांना युनियन देखील करता येणार नाही, असा दावा करत भाजपला इथून पुढे निवडून न देण्याचं आवाहन त्यांनी केलं.  (If the BJP returns to power in the country in 2024, 90 percent workers laws will be broken Says jayant Patil)

जयंत पाटील राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने जळगाव दौऱ्यावर आहेत. काल एका सभेच्या निमित्ताने जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी तसंच भाजप सरकारवर शरसंधान साधलं. यावेळी बोलताना त्यांनी देशात 2024 ला पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील, असं मोठं वक्तव्य केलं.

काय म्हणाले जयंत पाटील..?

देशात 2014 ला भाजपचं सरकार आलं. पहिल्या टर्मची पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर देशवासियांनी पुन्हा एकदा भाजपला कौल दिला. मात्र आज आपण पाहतो आहोत की शेतकरी, कामगार वर्गाचं ऐकून घ्यायला सरकार तयार नाही. त्यांच्या हिताचे निर्णय सरकार घेत नाही.या वर्गाला देशोधडीला लावायचं काम सरकारने केलं आहे. तेव्हा देशात पुन्हा 2024 ला भाजपचं सरकार आलं तर 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील. देशातल्या कोणत्याच कामगाराला आपल्या हिताचे संरक्षण करण्याकरिता कायदे करता येणार नाही अशी व्यवस्था मोदी सरकारने केली आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे आणि गोपीनाथ मुंडेंमुळे भाजपला राज्यात ओळख

देशात भारतीय जनता पार्टी पक्ष हा पुंजी पंती लोकांचा पक्ष आहे समजलं जायचं परंतु गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यामुळे भाजपा हा बहुजनांचा पक्ष आहे म्हणून अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला प्रतिसाद मिळायला लागला आणि त्याच कारणामुळे भाजपला सत्ता स्थापन करता आली, असंही जयंत पाटील म्हणाले.

शेतकरी कामगारांचं शोषण सुरु

स्वातंत्र्यापासून भाजपा वाले पुंजी पंती लोकांचं हित संपादन करतील साधतील असं लोकांना वाटायचं मात्र नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून देशात शेतकऱ्यांच्या संबंधित मदत करण्याचे कायदे मोडित निघताना दिसत आहेत. कारखान्यांमधील कामगारांना काढून टाकण्याचा अधिकार कारखानदाराकडे या मोदी सरकारने दिले आहेत, असे आरोप जयंत पाटील यांनी केला.

(If the BJP returns to power in the country in 2024, 90 percent workers laws will be broken Says jayant Patil)

हे ही वाचा :

पार्थ पवार पडला तेव्हा तुमची लायकी नव्हती का; गोपीचंद पडळकरांचा अजितदादांवर पलटवार

मंत्री व्हायला अक्कल लागत नाही, रात्रंदिवस झोपलं तरी चालतं: सदाभाऊ खोत

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.