100 दिवसात पत्रकारांना काहीच मिळालं नाही, हीच सरकारची अचिव्हमेंट : शरद पवार 

शरद पवारांनी (Sharad Pawar on Thackeray Sarkar achievement) राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

100 दिवसात पत्रकारांना काहीच मिळालं नाही, हीच सरकारची अचिव्हमेंट : शरद पवार 
Follow us
| Updated on: Mar 11, 2020 | 4:32 PM

मुंबई : “महाराष्ट्रातील सरकार उत्तम काम करत आहे. उद्धव ठाकरे सर्वांना एकत्र घेऊन पुढे जात आहेत. हे सरकार (Sharad Pawar on Thackeray Sarkar achievement) पाच वर्ष चालणार आहे.  शंभर दिवसात पत्रकारांना काहीच मिळालं नाही, हीच सरकारची अचिव्हमेंट आहे”, अशी मिश्किल टिपण्णी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar on Thackeray Sarkar achievement) यांनी केली. शरद पवारांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आज आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून राज्य आणि देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

काँग्रेसने चौथ्या जागेवर दावा केल्याने आज केवळ शरद पवारांचाच अर्ज दाखल करण्यात आला. फौजिया खान यांचा अर्ज वेटिंगवर ठेवण्यात आला. त्याबाबत पवार म्हणाले, “उद्या सकाळपर्यंत राज्यसभेच्या चौथ्या जागेसंदर्भात निर्णय होईल. एकत्रित बसून निर्णय घेतला जाईल”

कमलनाथांवर लोकांना विश्वास

मध्य प्रदेशातील राजकीय आपत्तीबाबत शरद पवार म्हणाले, “मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कर्तत्वावर लोकांना विश्वास आहे. अजूनही चमत्कार होईल असं ऐकण्यात येतंय. मी काँग्रेसवर बोलणार नाही. पण जी संधी द्यायला हवी होती ती द्यायला उशीर झाला. काँग्रेसमध्ये नेतृत्व आहे, भविष्य आहे. महाराष्ट्राचं सरकार हे पाच वर्ष काम करेल”

कोरोनाबाबत काळजी घ्या

शक्यतो जाहीर सभा मेळावे टाळावे अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत. मोठे समारंभ, खेळाच्या स्पर्धांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकं उपस्थित असतात. आपण घाबरून जाण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.