ठाणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटचे (Oxygen plant) लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झालं. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut), ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते.