सुनील तटकरेंच्या नामसाधर्म्याचे दोन्ही अपक्ष उमेवदार बेपत्ता

गुहागर (रत्नागिरी) : रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे असा समाना रंगणार आहे. मात्र, ‘सुनील तटकरे’ नावाचे आणखी दोन उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने, रायगडमधील निवडणुकीला आणखी रंग चढला होता. कारण 2014 साली नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवाराचा फटका सुनील तटकरे यांना बसला होता. […]

सुनील तटकरेंच्या नामसाधर्म्याचे दोन्ही अपक्ष उमेवदार बेपत्ता
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

गुहागर (रत्नागिरी) : रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे असा समाना रंगणार आहे. मात्र, ‘सुनील तटकरे’ नावाचे आणखी दोन उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने, रायगडमधील निवडणुकीला आणखी रंग चढला होता. कारण 2014 साली नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवाराचा फटका सुनील तटकरे यांना बसला होता. मात्र, यावेळी सुनील तटकरे यांच्या नामसाधर्मयाचे दोन्ही अपक्ष उमेदवार बेपत्ता झाले आहेत.

सुनील तटकरे यांच्या नामसाधर्म्याचे दोन्ही अपक्ष उमेदवार बेपत्ता झाले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे हे दोघेही 11 एप्रिलपासून बेपत्ता झाले आहेत. निवडणूक कायद्याप्रमाणे उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून त्याच्या खर्चाचा दैनंदिन हिशेब देणे बंधनकारक आहे. मात्र, रायगड लोकसभा निवडणूक रिंगणातील सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे या उमेदवारांनी अद्याप त्यांच्या खर्चाचा कोणताही हिशेब दिलेला नाही.

वाचा : रायगडमध्ये डमी उमेदवारांमुळे सुनील तटकरे आणि अनंत गीतेंची चिंता वाढली

दोन दिवसात सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे या दोन्ही उमेदवारांनी खर्च सादर केला नाही, तर निवडणूक कायद्यान्वये या दोन्ही उमेदवारांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई होऊ शकते.

रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गीते

रायगड लोकसभा मतदारसंघात 2014 प्रमाणे यंदाही ‘तटकरे विरुद्ध गीत’ अशी लढत होणार आहे. केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे असा समाना रायगडमध्ये रंगणार आहे. गेल्यावेळी म्हणजे 2014 साली सुनील तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता. अवघ्या दोन हजार मतांनी तटकरे पराभूत झाले होते. या परभवला बऱ्याच अंशी त्यांच्या नावाचा आणखी एक ‘सुुनील तटकर’ कारणीभूत ठरला होता.

रायगडमध्ये 23 एप्रिलला मतदान

रायगड मतदारसंघासाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 14 जागांसाठी मतदान होईल. लोकसभेचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.