भारतालाही एका जो बायडनची गरज, 2024 पर्यंत मिळो असाच नेता; दिग्विजय सिंह यांचं मोठं वक्तव्य

अमेरिकेत जसा जो बायडन यांनी रोमहर्षक विजय मिळवला तशाच पद्धतीने भारताला जो बायडन यांची आवश्यकता आहे. आशा आहे 2024 ला आम्हाला त्यांच्यासारखा नेता मिळेल, असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले.

भारतालाही एका जो बायडनची गरज, 2024 पर्यंत मिळो असाच नेता; दिग्विजय सिंह यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 8:51 PM

नवी दिल्ली : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धूळ चारत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बायडन यांनी ट्रम्प यांचा पराभव केला केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण जगातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीही बायडन यांना शुभेच्छा दिल्या. सोबतच भारतालाही एका जो बायडनची गरज असल्याचं मत सिंह यांनी व्यक्त केलं आहे. (India need A joe biden hope We get 2020 Election Says Digvijaya Singh)

“अमेरिकेप्रमाणे भारतालाही जो बायडन यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे. तो नेता जरी विशिष्ट पक्षाशी संबंधित असला तरीदेखील भारत आणि भारतीयत्व त्याच्यासाठी अधिक महत्वाचं असेल. देशात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना हरवून त्याने देशातल्या सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावा आणि 2024 मध्ये निश्चितपणे असा नेता भारताला लाभेल”, असा आशावाद दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

जो बायडन यांना निवडून दिलेल्या अमेरिकेच्या जनतेचं मनापासून अभिनंदन. बायडन अमेरिकेची एकात्मता टिकवून ठेवण्याचं काम करतील. तसंच पहिल्या नेत्यासारखी विभाजनाची भाषा करणार नाही, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

आपण करुन दाखवलं, अमेरिकेचे पुढचे अध्यक्ष जो बायडन- कमला हॅरिस  

निवडणूक निकालानंतर नवनियुक्त उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी जो बायडन यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं आहे. ‘जो आपण करुन दाखवलं. अमेरिकेचे पुढचे अध्यक्ष आपण असणार आहेत’, असं असं कमला हॅरिस म्हणाल्या. या संभाषणावेळी कमला हॅरिस यांच्या चेहऱ्यावर खळखळून हास्य होते. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत होता.

आपण अमेरिकेला वेगळ्या उंचीवर घेऊन जाल- राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जो बायडन यांचं ट्विट करुन अभिनंदन केलं. “जो बायडन आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आपण अमेरिकेल्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाल”, असं राहुल गांधी म्हणाले.

बायडन, दिमाखदार विजयाबद्दल आपलं अभिनंदन- शरद पवार 

“जो बायडन आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन”, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. तसंच त्यांनी उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या कमला हॅरिस यांचंही अभिनंदन केलं आहे.

संबंधित बातम्या

जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव; अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात!

हिलरी क्लिंटन यांच्यापासून राहुल गांधी, शरद पवार… जो बायडन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

‘जो’ जीता वही सिकंदर!; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.