Sudhir Mungantivar : शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्’ने संभाषणाला होणार सुरुवात, सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मंत्रिमंडळ विस्तारानंतर तीन दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खातेवाटप केले. यात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना वन, सांस्कृतिक विभाग आणि मत्स व्यवसाय विभागाचे मंत्रिपद देण्यात आले आहे.

Sudhir Mungantivar : शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषणाला होणार सुरुवात, सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषणाला होणार सुरुवात
Image Credit source: Twitter
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 14, 2022 | 8:34 PM

चंद्रपूर : हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापुढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् (Vande Mataram) म्‍हणत संभाषणा (Conversation)ला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्‍याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी केली आहे. मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होऊन सांस्‍कृतिक खात्‍याची जवाबदारी येताच स्वातंत्र्यदिनाच्‍या पुर्वसंध्‍येला सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. सांस्‍कृतिक कार्य विभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्‍यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

शासकीय कार्यालयांमध्‍ये यापुढे वंदे मातरम् म्‍हणत संभाषण सुरु करणार

वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसून भारतीयांच्‍या भारतमातेविषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. 1875 मध्‍ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्‍याकाळात स्‍वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्‍याचं काम करत होते. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्‍यक्‍त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्‍तीचे स्‍फुल्‍लींग चेतविले. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्‍या या रचनेतील एकेक शब्द उच्‍चारताच देशभक्‍तीची भावना जागृत होते. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापुढे वंदे मातरम् म्‍हणत संभाषण सुरु करणार आहोत. 1800 साली टेलिफोन अस्‍तित्‍वात आल्‍यापासून आपण हॅलो या शब्‍दाने संभाषण सुरु करतोय. आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर केले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तीन दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खातेवाटप केले. यात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना वन, सांस्कृतिक विभाग आणि मत्स व्यवसाय विभागाचे मंत्रिपद देण्यात आले आहे. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयांमध्ये वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करण्याची घोषणा केली. (Instead of hello in government offices, the conversation will start with Vande Mataram)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें