मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari) यांची भेट घेतली. लॉकडाऊनमध्ये लोकांना रोजगार नाही, पैसा नाही तरीही लोकांची वीजबिलं चार-पाच पट आली आहेत, त्या बिलांच्या कपातीबाबत निर्णय व्हावा अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राज्यपाल यांच्या भेटीकडे जसं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं, तसंच राज्यपालही या भेटीसाठी उत्सुक होते असं दिसतंय. (It has been a year since we came to Maharashtra, but we have not seen the Raj of Maharashtra said Bhagat Singh Koshiyari )