व्हायरल वास्तव : मतदान ओळखपत्र नसलं, तरी फॉर्म क्र. 7 भरुन मतदान करता येणार?

व्हायरल वास्तव : मतदान ओळखपत्र नसलं, तरी फॉर्म क्र. 7 भरुन मतदान करता येणार?


मुंबई : मतदार ओळखपत्र नसले तरी किंवा मतदान यादीत नाव नसले तरी फॉर्म क्रं 7 भरुन मतदान करता येते अशी माहिती सध्या फेसबुक, व्हॉट्स्अप आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही माहिती खोटी असून मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मतदार ओळखपत्र नसले तरी किंवा मतदान यादीत नाव नसले तरी फॉर्म क्रमांक 7 भरून मतदान करता येईल असा मॅसेज व्हायरल होत आहे. याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, फॉर्म क्रं. 7 हा इतर व्यक्तिचे नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी, स्वत:चे नाव वगळण्यासाठी, इतर कोणत्याही व्यक्तिचे नाव मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी अर्ज करण्यासंदर्भातील आहे. या फॉर्मद्वारे कोणलाही मतदान करता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणार हा मॅसेज खोटा असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच अशाप्रकारे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही पोस्टवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही निवडणूक आयोगाने केले आहे.

तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नाही, मग हे करा…

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. तसेच मतदान यादीत नाव असेल आणि मतदार ओळखपत्र नसेल तर निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या अकरा ओळखपत्रांच्या आधारे मतदानाचा हक्क बजावता येईल, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI