AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा, धनंजय मुंडेंचं भविष्य एकाच दिवशी ठरणार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी राज्यभरात 21 ऑक्टोबरलाच मतदान होणार आहे, तर जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणीही त्याच दिवशी होणार आहे.

जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा, धनंजय मुंडेंचं भविष्य एकाच दिवशी ठरणार
| Updated on: Sep 30, 2019 | 12:40 PM
Share

बीड : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Jagamitra Sugar Mill Dhananjay Munde) यांना सर्वोच्च न्यायालयात तूर्तास दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार असल्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंडेंच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे.

योगायोगाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी राज्यभरात 21 ऑक्टोबरलाच मतदान होणार आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटावर धनंजय मुंडे पुन्हा एकदा परळी मतदारसंघातून निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. बहीण आणि भाजपच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांच्याविरोधात ते उभे ठाकले आहेत. त्यामुळे एकीकडे राजकीय भवितव्य मतपेटीत बंदिस्त होत असतानाच जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन घोटाळा झाल्याच्या आरोपातही त्यांचा निकाल (Jagamitra Sugar Mill Dhananjay Munde) येणार आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जून महिन्यात दिले होते. धनंजय मुंडे दोषी असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, अशी विचारणा करत बर्दापूर पोलिस स्टेशनला मुंडेंविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

जगमित्र साखर कारखाना प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. हा साखर कारखाना सुरु करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी (Jagamitra Sugar Mill Dhananjay Munde) 2006 ते 2010 या कालावधीत शेकडो एकर जमीन विकत घेतली त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून तब्बल 25 कोटी रुपयांचं भागभांडवलही उभं केलं. मात्र कारखाना काही सुरु झाला नाही.

या प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी पूस या गावात असलेल्या बेलखंडी मठाची 25 एकर जमीनही विकत घेतली. ही जमीन बेलखंडी मठाला इनाम दिलेली. जमीन होती आणि त्याचा विक्री व्यवहार होऊ शकत नव्हता याची माहिती असतानाही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन विकत घेण्यात आली आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडले.

पुढे जगमित्र साखर कारखान्याची मान्यता नाकारण्यात आली आणि हा कारखाना सुरु होण्याआधीच बंद पडला. पण त्यानंतरही कारखान्याने जमीन परत केली नाही.

रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचं सांगत त्यांनी उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. फड यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे यांच्यासह एकूण 14 जणांविरोधात (Jagamitra Sugar Mill Dhananjay Munde) गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश शासनाला देण्याची विनंती केली होती.

संबंधित बातम्या 

स्पेशल रिपोर्ट : धनंजय मुंडेंना सुप्रीम कोर्टाकडून खरंच दिलासा मिळालाय का?   

आरोपी क्रमांक 10… धनंजय मुंडेंविरोधात ‘420’चा गुन्हा दाखल  

जमिनींचं खरेदीखत गुन्हा असतो, कारस्थान नाही, धनंजय मुंडेंना धस यांचं उत्तर 

धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन  

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.