जमिनींचं खरेदीखत गुन्हा असतो, कारस्थान नाही, धनंजय मुंडेंना धस यांचं उत्तर

“सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम देण्यात आली होती. हीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करुन त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. कृषी जमीनही अकृषिक केली,” असा आरोप याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी केला होता.

जमिनींचं खरेदीखत गुन्हा असतो, कारस्थान नाही, धनंजय मुंडेंना धस यांचं उत्तर

बीड : सरकारी जमीन हडपल्याच्या आरोपाप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. “सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम देण्यात आली होती. हीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करुन त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. कृषी जमीनही अकृषिक केली,” असा आरोप याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी केला होता. त्यावर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली.

धनंजय मुंडेंवर राष्ट्रवादीचे माजी नेते आणि भाजपचे विद्यमान आमदार सुरेश धस यांनी पत्रकाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेते भाजपाध्यक्ष अमित शाह यांना तडीपार नेता म्हणतात, मग पवार साहेबांना अनेक शेतकऱ्यांची जमीन लुबाडणारा नेता चालतो का, असा सवाल करत धस यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय.

दरम्यान, या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी रत्नाकर गुट्टेंवरील गुन्ह्यांचा सूड म्हणून कारवाई होत असल्याचा आरोप कोर्टाच्या निर्णयानंतर केला होता. याचाही समाचार सुरेश धस यांनी घेतला. रत्नाकर गुट्टेंवर अपहाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावर पाच दिवसांपूर्वीच इडीने कारवाई केली. तब्बल दहा वर्षांपासून धनंजय मुंडेंनी पोलिसांवर दबाव आणत आजवर दाबलेलं प्रकरण माननीय ऊच्च न्यायालयामुळे ऊजेडात आल्याचं धस यांनी म्हटलंय. शिवाय सरकारी इनामी जमिनींचे खरेदीखत आणि एनए करणं गुन्हा आहे, कारस्थान नाही. हे गुन्हे धनंजय यांनी भाजपमध्ये असताना केलेले आहेत, ते षडयंत्रांचा कांगावा नेहमीचा करत असतात, असा टोला त्यांनी लगावला.

व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *