..तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही- खडसे

आज एकनाथ खडसे यांनी जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. कार्यालयात प्रवेश करतानाच खडसे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. तर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खडसे यांचं औक्षण केलं.

..तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही- खडसे

जळगाव: भाजपला राम-राम ठोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसंच राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी खडसे यांचं औक्षण करुन कार्यालयात स्वागत केलं. आज दसरा आहे. वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाने मात करण्याचा दिवस आहे. यापुढे आपणही समाजातील वाईट प्रवृत्तीविरोधात लढा द्यायचा आहे, असा संदेश खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. (Jalgaon Eknath Khadse NCP office welcome)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रवेश करतानाच खडसे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. तर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खडसे यांचं औक्षण केलं. खडसे पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आल्यानं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं तर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही, असा विश्वासही खडसेंनी व्यक्त केला. खडसे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, माजी आमदार मनीष जैन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

त्यांनी ‘ईडी’ लावली तर मी ‘सीडी’ लावेन- खडसे

तब्बल ४ दशकांची भाजपची साथ सोडून एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, अरुण गुजराथी यांसह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत एन्ट्री केली. आपल्यामागे ईडी (सक्तवसुली संचालनालय)ची चौकशी लावली तर आपण ‘सीडी’ लावू, असा धमकीवजा इशाराच खडसे यांनी भाजपला दिला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, आपण फक्त फडणवीसांमुळे भाजप सोडत असल्याचं खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी सांगितलं.

“दिल्लीतील वरिष्ठांनीही राष्ट्रवादीत जाण्यास सांगितलं”

‘आपली नाराजी आपण दिल्लीतील वरिष्ठांनाही सातत्यानं सांगितली. त्यांनीही मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तुम्हाला आता भाजपमध्ये भविष्य नाही. त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करा’, असा सल्ला दिल्लीतील वरिष्ठांनी दिल्याचा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. तसंच ‘जयंतराव थोडं थांबा, कुणी किती भूखंड हडप केले ते सांगतो’, अशा शब्दात खडसे यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांना इशाराही दिला.

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश, नव्या राजकीय इनिंगला सुरुवात!

दिल्लीतल्या वरिष्ठांनी सांगितलं तुम्हाला पक्षात संधी नाही, तुम्ही राष्ट्रवादीत जा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

स्पेशल रिपोर्ट : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील राजकारण कसं बदलणार?

Jalgaon Eknath Khadse NCP office welcome

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI