जळगाव जिल्हा परिषदेत भाजपचंच वर्चस्व, खडसे-महाजनांनी एकमेकांना लाडू भरवला

राज्याचं लक्ष लागलेल्या जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या (Jalgaon ZP president election) निवडणुकीत भाजपने बाजी मारत आपला गड शाबूत ठेवला आहे.

जळगाव जिल्हा परिषदेत भाजपचंच वर्चस्व, खडसे-महाजनांनी एकमेकांना लाडू भरवला
Follow us
| Updated on: Jan 03, 2020 | 4:33 PM

जळगाव : राज्याचं लक्ष लागलेल्या जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या (Jalgaon ZP president election) निवडणुकीत भाजपने बाजी मारत आपला गड शाबूत ठेवला आहे. भाजपने 34-30 असा विजय मिळवत, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्ष (Jalgaon ZP president election) म्हणून रावेरच्या रजनी पाटील तर उपाध्यक्षपदी लालाचंद पाटील हे विजय झाले. यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व सिद्ध झालं आहे.

या विजयानंतर भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी एकमेकांना पेढा भरवून, आपल्यात कोणतीही कटूता नाही असं स्पष्ट केलं. तसंच जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एकत्रच काम करत असतो, असंही खडसे आणि महाजन यांनी सांगितलं.

“जळगाव जिल्हा परिषदेत भाजपला 34 मतं मिळाली, तर महाविकासआघाडीला 30 मतं मिळाली आहेत. एकंदरीत घवघवीत असं यश भाजपला मिळालेलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बोलबाल केला की आम्ही सारे एकत्र आहोत त्यामुळे आमचा विजय नक्की असं त्यांनी घोषीत केले होते. पण त्यावर मात करुन भाजपने स्वबळावर चांगलं असं यश मिळवलं”, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.

“कुणी कितीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तरी भाजपचे मतदार हे ठाम आहेत. उलट आमचे या ठिकाणी 32 होते त्यांचे दोन येऊन आम्हाला मिळाले. आणखी थोडावेळ मिळाला असता तर तीन-चारजण येऊन मिळाले असते पण ते पोहोचू शकले नाही, असंही यावेळी खडसेंनी सांगितले.

जळगाव जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याची शक्यता होती. या निवडणुकीपूर्वी भाजप काँग्रेसच्या साथीने सत्तेत होती. मात्र राज्याचं राजकारण बदलल्यानंतर, महाविकास आघाडी एकत्र आली.

जळगाव जिल्हापरिषदेतील पक्षीय बलाबल 

(बहुमतासाठी 34 आवश्‍यक) 

भाजप-33

काँग्रेस-04

शिवसेना-14

राष्ट्रवादी-16

एकूण – 67

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.