एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, जयंत पाटलांची अधिकृत घोषणा

एकनाथ खडसे यांनी स्वत: पक्षाचा त्याग केल्याचं आपल्याला सांगितल्याची माहिती जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना खडसे यांनी कुठलीही अट ठेवली नसल्याचंही पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, जयंत पाटलांची अधिकृत घोषणा

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांनी स्वत: पक्षाचा त्याग केल्याचं आपल्याला सांगितल्याची माहिती जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना खडसे यांनी कुठलीही अट ठेवली नसल्याचंही पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा दिवसाढवळ्या होईल, अंधारात नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे. (Jayant Patil on Eknath Khadse NCP entry)

राष्ट्रवादीत खडसेंना काय मिळणार?

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची चर्चा आहे. त्यावर विचारलं असता खडसे यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना कोणती जबाबदारी द्यायची हे निश्चित करण्यात येईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, खडसे यांना राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण, जलसंपदा किंवा कृषी खात्याची जबाबदारी देण्यात येईल, अशी चर्चा सध्या राष्ट्रवादीच्या गोटात सुरु आहे.

खडसेंसोबत कोणते नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

भाजप नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत दोन विद्यमान आमदारही राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे. त्यावर बोलताना खडसेंच्या संपर्कात भाजपचे अनेक नेते आहेत. सध्या कोरोनामुळं त्यांचा प्रवेश होणार नाही. पण येणाऱ्या काळात भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावा जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलाय.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे खडसे समर्थक आमदारांना तूर्तास राष्ट्रवादीत प्रवेश नाही: जयंत पाटील

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून कोणतं मंत्रिपद मिळू शकतं?

Jayant Patil on Eknath Khadse NCP entry

Published On - 1:30 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI