जयसिद्धेश्वर यांच्या नावाने फेक व्हिडीओ व्हायरल, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सोलापूर : विचित्र हावभाव करत बेधुंद होऊन नाचणाऱ्या एका साधूचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोलापूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेले डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या व्हिडीओशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं समोर आलं आहे. तर याप्रकारे व्हिडीओ व्हायरल करुन महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी तक्रार पोलिसांत दाखल […]

जयसिद्धेश्वर यांच्या नावाने फेक व्हिडीओ व्हायरल, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

सोलापूर : विचित्र हावभाव करत बेधुंद होऊन नाचणाऱ्या एका साधूचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोलापूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेले डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या व्हिडीओशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं समोर आलं आहे. तर याप्रकारे व्हिडीओ व्हायरल करुन महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली. याप्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापुरात डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे नाव लोकसभा निवडणुकांच्या काळात समोर आलं. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे सोलापुरातून लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या नावावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओमध्ये बेधुंद होऊन नाचणारे एक साधू महाराज दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला.

दुसरीकडे, अशा प्रकारचा व्हिडीओ व्हायरल करुन महाराजांची बदनामी करण्यात आली, तसेच त्यांच्या भावनाही दुखावल्या गेल्या, असा आरोप समर्थकांनी केला. या प्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सुमित भोसले, मुग्धा कर्णिक यांच्या विरोधात हिंदूमहासभेच्या सुधाकर बहिरवाडे यांनी तक्रार केली आहे. फौजदार चावडी पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू महासभेच्या तक्रारीनंतर शिवसेनेनेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार केली.

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या नावावर टाकलेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील एका लग्न समारंभातील आहे. पहिल्यांदा हा व्हिडीओ 1 ऑगस्ट 2013 ला युट्यूबवर टाकण्यात आला होता. त्यात ‘मेरे पिंजरे मे पोपट बोले’ आणि ‘बदले मे यूपी बिहार लेले’ या गाण्यावर हा साधू नाचत होता. त्यानंतर 27 जुलै 2013 ला या गाण्यात बद्दल करून कन्नड गाण्यावर साधू नाचत असल्याचं भासवण्यात आलं. निवडणुकीच्या तोंडावर हाच व्हिडीओ पुन्हा व्हायरल करण्यात आला. या व्हिडीओचा संबंध सोलापूर लोकसभेचे उमदेवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांशी लावण्यात आला. मात्र, त्यांचा या व्हिडीओशी काहीही  संबंध नसल्याचं समोर आलं.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.