AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हा मी सावत्र होतो का?, जितेंद्र आव्हाड यांची खदखद; कुणाला केला सवाल?

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचं शिर्डीत कार्यकर्ता शिबीर सुरू आहे. तीन दिवस हे शिबीर चालणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते शिर्डीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरचं शिर्डीतील हे पहिलंच शिबीर आहे. या शिबीरातून शरद पवार गटाच्या सर्वच नेत्यांनी अजितदादा गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच हल्ला चढवला आहे.

तेव्हा मी सावत्र होतो का?, जितेंद्र आव्हाड यांची खदखद; कुणाला केला सवाल?
ajit pawar and jitendra awhad
| Updated on: Jan 03, 2024 | 5:58 PM
Share

अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, शिर्डी | 3 जानेवारी 2023 : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. मला कोरोना झाला. मी आजारी असताना माझं पालकमंत्री काढून घेतलं. तेव्हा मी काय सावत्र होतो का? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना केला आहे. तसेच अजितदादांनी आपण इच्छुक असलेलं पालकमंत्रीपदही दुसऱ्याला दिल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

शिर्डीत राष्ट्रवादीचं कार्यकर्ता शिबीर सुरू आहे. या शिबिराला संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप केला आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळात मी मंत्री होतो. पण पालकमंत्री नव्हतो. तेव्हा पालकमंत्री ठरवण्याचं काम हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे मिळून ठरवत होते. तेव्हा मी अजित पवार यांना भेटून पालकमंत्री पद मिळण्याची इच्छा व्यक्त केली होती. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी मी इच्छुक होतो. पण आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद हे देण्यात आलं. मी ज्येष्ठ आमदार नाही का? असा माझा तेव्हा त्यांना सवाल होता, असं सांगतानाच मला कोरोना झाला तेव्हा माझं पालकमंत्री पद काढून घेतलं.  तेव्हा मी सावत्र होतो का? अजित पवार यांना सुद्धा कोरोना झाला होता. तेव्हा त्यांनी पालकमंत्रीपद का सोडलं नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. शरद पवार यांनीच मला सोलापूरचं पालकमंत्रीपद दिलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

तर संविधान समुद्रात बुडवलं जाईल

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दाव्यावरही टीका केली. खासदाराचा आकडा 400 पार होण्याचं स्वप्न तुम्ही पाहत आहात. सर्वजण स्वप्ने पाहू शकतात. स्वप्न मी सुद्धा पाहू शकतो. देशाची लोकशाही 100% नेस्तनाबूत करण्याचा काम हे केलं जाणार आहे. त्यासाठीच त्यांना 405 खासदार लागणार आहेत. असं झालं तर या देशाचं संविधान हे अरबी समुद्रात बुडवलं जाईल, असा दावाही त्यांनी केला.

तुम्ही एकनाथ शिंदे नाहीत, तर…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी टीका केली. एखाद्या मुख्यमंत्र्याने धर्माचा वापर करुन वक्तव्य करणं, उचकावणं हे चुकीच आहे. तुम्ही आता एकनाथ शिंदे नाहीत, तर तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहात. त्यामुळे एका धर्माला उचकावणं चुकीचं आहे. महारष्ट्राला आग आणि जाळपोळ हेच हवं आहे का? असा सवाल करतानाच संविधान टिकवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे पण मुख्यमंत्री तसं वागत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल