AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्याने देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’, जितेंद्र आव्हाडांकडून पंतप्रधान मोदींची हिटलरशी तुलना

जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना थेट हिटलरशी केली आहे (Jitendra Awhad compares PM Narendra Modi to Hitler).

‘त्याने देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’, जितेंद्र आव्हाडांकडून पंतप्रधान मोदींची हिटलरशी तुलना
| Updated on: Feb 24, 2021 | 6:46 PM
Share

मुंबई : अहमदाबादमधील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना थेट हिटलरशी केली आहे. “हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं”, असा टोला आव्हाडांनी मोदींना लगावला आहे (Jitendra Awhad compares PM Narendra Modi to Hitler).

नेमकं प्रकरण काय?

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याआधी मैदानाचं नाव बदलण्यात आलं. हे मैदान मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर त्याची पुन्हा बांधणी करण्यात आली आणि संपूर्ण परिसराचं नाव सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स असं करण्यात आलं होतं. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याआधी या कॉम्पलेक्समधील क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलत नरेंद्र मोदी स्टेडियम असं देण्यात आलं. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे (Jitendra Awhad compares PM Narendra Modi to Hitler).

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. नामांतरावरुन जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडलं आहे. “स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते आणि गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”, असं ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे.

या स्टेडियमची ठळक वैशिष्ट्य काय?

साधारणपणे कोणत्याही स्टेडियममध्ये 2 ड्रेसिंग असतात. पण मोटेरामध्ये तब्बल 4 ड्रेसिंग रुम आहेत. प्रत्येक ड्रेसिंग रुममध्ये सुसज्ज जीमची सोय आहे. या स्टेडियमध्ये एकूण 55 क्लबहाऊस आहेत. त्यात 3 प्रॅक्टीससाठीची मैदानं आणि 50 खोल्यांचा समावेश आहे.

ऑलिम्पिकसाठी बनवतात तसा स्विमींग पूलसुद्धा या स्टेडियममध्ये आहे. इनडोअर क्रिकेट अकादमी, बॅडमिंटन, टेनिस कोर्ट, टेबल-टेनिस एरीना, स्क्वॅश एरीना, 3D प्रोजेक्टर असलेलं थिएटरही या स्टेडियममध्ये आहे. या स्टेडियममध्ये फ्लड लाइटऐवजी LED लाइट्स वापरलेत. यामुळे कशाचीच सावली दिसत नाही. अनेकदा खेळाडूंना सामन्यादरम्यान सावलीमुळे अडथळा निर्माण होता.

मोटेरा स्टेडियमच्या मैदानात 4-6 नव्हे तर तब्बल 11 खेळपट्ट्या आहेत. लाल, काळी आणि दोन्ही प्रकारची माती अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या या खेळपट्ट्या आहेत. यातल्या काही वेगवान तर काही फिरकी गोलंदाजांस मदतशीर आहेत. स्पर्धेची, मॅचची गरज बघून खेळपट्टी निवडता येणार आहेत.

संबंधित बातमी : मोटेराच्या मैदानात पहिल्याच दिवशी गुगली, अमित शाहांनी मैदानाचं नावच बदललं!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.