दिवसभर बैठकात व्यस्त, ज्योतिरादित्य शिंदे लग्नाचा वाढदिवसही विसरले

भोपाळ : मध्य प्रदेशात तब्बल 15 वर्षांनी सत्ता आल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आनंद गगनाला भिडलाय. आता मोठं आव्हान आहे मुख्यमंत्रीपदाचा योग्य उमेदवार निवडनं. प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि युवा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे पक्षाच्या बैठकांमध्ये एवढे व्यस्त होते, की लग्नाचा 24 वा वाढदिवसही ते विसरले आणि रात्री उशिरापर्यंत दिल्लीतील …

दिवसभर बैठकात व्यस्त, ज्योतिरादित्य शिंदे लग्नाचा वाढदिवसही विसरले

भोपाळ : मध्य प्रदेशात तब्बल 15 वर्षांनी सत्ता आल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आनंद गगनाला भिडलाय. आता मोठं आव्हान आहे मुख्यमंत्रीपदाचा योग्य उमेदवार निवडनं. प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि युवा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे पक्षाच्या बैठकांमध्ये एवढे व्यस्त होते, की लग्नाचा 24 वा वाढदिवसही ते विसरले आणि रात्री उशिरापर्यंत दिल्लीतील घरी जाऊ शकले नाही.

ज्योतिरादित्य शिंदे यांचा 12 डिसेंबर 1994 रोजी प्रियदर्शिनी राजे शिंदे यांच्यासोबत विवाह झाला. लग्नाच्या वाढदिवसाला शिंदे यांना अनेक समर्थकांनी शुभेच्छा दिल्या. पण पक्षाच्या कामामुळे त्यांना दिवसभर कुटुंबीयांना वेळ देता आला नाही. ज्योतिरादित्य शिंदे राजघराण्यातील आहेत. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1971 साली झाला. त्यांचे वडील माधवराव शिंदे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. पण एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ज्योतिरादित्य यांनी राजकीय वारसा सांभाळला.

मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार

ज्योतिरादित्य शिंदे या प्रभावी चेहऱ्याचा पर्यायही काँग्रेसकडे आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईत झालं. नंतर देहरादूनच्या प्रसिद्ध दून स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. स्टॅरफोर्ड बिझनेस स्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतलं. यानंतर ते साडे सात वर्ष अमेरिकेत राहिले आणि नोकरी केली. त्यांचे वडील माधवराव शिंदे यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर ज्योतिरादित्य राजकारणात आले.

गुना या मध्य प्रदेशातील मतदारसंघातून पहिल्यांदा त्यांनी 2002 साली निवडणूक लढली आणि निवडून आले. आतापर्यंत ते सलग चार वेळा निवडून आले आहेत. 2012 ते 2014 या काळात त्यांना यूपीए सरकारमध्ये मंत्रीपदही देण्यात आलं होतं. त्यांची आत्या वसुंधरा राजे या राजस्थानच्या मावळत्या मुख्यमंत्री होत्या. तर यशोधरा राजे मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री होत्या.

राजघरण्यातील असूनही साधं राहणं, सौम्य चेहरा, उदार मन आणि सरळ स्वभाव हे ज्योतिरादित्य शिंदे यांचं वैशिष्ट्य आहे. पक्षातील युवा नेता म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या विश्वासतले नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *