AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांची खेळी हसन मुश्रीफांना पडणार भारी? कागलचं राजकीय गणित काय सांगतंय? कोण आहेत समरजितसिंह घाटगे?

शरद पवार यांच्या खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्यासाठी यंदाची कागल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत समरजीतसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात चांगलीच चुरस पहायला मिळणार आहे.

शरद पवारांची खेळी हसन मुश्रीफांना पडणार भारी? कागलचं राजकीय गणित काय सांगतंय? कोण आहेत समरजितसिंह घाटगे?
समरजीतसिंह घाटगे, शरद पवार आणि हसन मुश्रीफImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 18, 2024 | 12:30 PM
Share

कागल विधानसभा मतदारसंघ हा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल हे राजकीय विद्यापीठ म्हणूनही ओळखलं जातं. कारण इथल्या नेत्यांनी जिल्हा आणि राज्य पातळीवर कागलचा राजकीय दबदबा निर्माण केला आहे. जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समिती, आमदारकी, खासदारकी.. निवडणूक कोणतीही असो कागलच्या नेते आणि कार्यकर्त्यांचा त्यात समावेश ठरलेलाच असतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातही कागल तालुका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. याच कागलची यंदाची विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचं दिसतंय. यामागचं कारण म्हणजे शरद पवारांनी कोल्हापूर भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि तरुण नेते समरजितसिंह घाटगे यांच्या हाती तुतारी देऊन भाजपला दणका दिला आहे. खरंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते हसन मियालाल मुश्रीफ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदासंघातून सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून ते या पक्षात आहेत. मात्र राष्ट्रीवादीतील अजित पवार यांच्या बंडानंतर मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडली. आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी कागलचा उमेदवार पक्का करून...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ