AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : 4 राज्यात दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचा बडा नेता राजीनामा देण्याच्या तयारीत

Kamalnath may be Will Resign From Congress State President Madhya Pradesh : चार राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव... मध्यप्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये तर प्रचंड मोठा पराभव... यानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसचा बडा नेता राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

मोठी बातमी : 4 राज्यात दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचा बडा नेता राजीनामा देण्याच्या तयारीत
Updated on: Dec 05, 2023 | 10:40 AM
Share

भोपाळ | 05 डिसेंबर 2023 : देशात नुकतंच पार राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. यात राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु होणार का? अशी चर्चा होतेय. कारण काँग्रेसचा बडा चेहरा आता राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आजच कमलनाथ आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस हायकमांड कमलनाथ यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय. त्याचमुळे कमलनाथ आपला राजीनामा देण्याची शक्यता आहे.

‘ही’ कृतीमुळे नाराजी?

मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत काँग्रेसचा मोठ्या फरकाने पराभव झाला. अशात कमलनाथ यांच्या नेतृत्वावर काँग्रेस हायकमांड नाराज असल्याची माहिती आहे. पराभवानंतर पक्षातील नेत्यांना भेटण्याऐवजी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याऐवजी कमलनाथ यांनी भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. त्यांच्या घरी जात त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं अभिनंदन केलं. कमलनाथ यांच्या या कृतीवर काँग्रेस हायकमांड कमलनाथ यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय.

मध्यप्रदेशमधील निकाल अन् नाराजी

मध्यप्रदेशमधल्या 230 जागांपैकी भाजपला 163 जागांवर विजय मिळाला. तर काँग्रेस केवळ 66 जागांवरच विजय होऊ शकली. तर इतरांना 1 जागा मिळाली. या निकालानंतर कमलनाथ यांच्यावर दिल्लीत नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

आज भोपाळमध्ये बैठक

आज मध्यप्रदेशात काँग्रेसची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभववर विचार मंथन करण्यासाठी बैठक बोलावली आहे. 230 उमेदवारांना या बैठकीला बोलावण्यात आलं आहे. कमलनाथ यांच्याकडे कांग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यांचा राजीनामा मागितला जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसने पत्रक काढत 230 उमेदवारानं बैठकीला बोलवलं आहे. आज मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये ही बैठक होत आहे.

कमलनाथ यांच्याविरोधात नाराजीचा सूर

या निवडणुकीत तिकीट वाटपावेळी कमलनाथ यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना सामावून घेतलं नाही, अशी मध्यप्रदेशच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कमलनाथ यांनी अखिलेश यादव आणि नीतीश कुमार यांच्यावर केलेल्या टीपण्णीमुळे नाराजी पसरली. शिवाय मित्रपक्षांना हव्या असलेल्या जागाही द्यायला कमलनाथ यांनी असहमती दर्शवली. त्यानंतर आता कमलनाथ यांच्यावर काँग्रेस हायकमांड नाराज आहेत. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला लागू शकतो.

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक
युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक.
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम.
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?.
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?.
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.