Kerala Exit Poll Result 2021 Elections : केरळवर पुन्हा एकदा डाव्यांचाच झेंडा, भाजपला किती जागा मिळणार ?

डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या या राज्यावर यावेळी कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (kerala exit poll results 2021 elections live updates)

Kerala Exit Poll Result 2021 Elections : केरळवर पुन्हा एकदा डाव्यांचाच झेंडा, भाजपला किती जागा मिळणार ?
KERALA ASSEMBLY ELECTION
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 7:42 PM

तिरुअनंतपुरम : देशात एकूण 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Kerala Elections) मोठ्या जोमात पार पडल्या. आज पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता सर्वांना या पाच राज्यांवर कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता लागली आहे. यामध्ये सर्वात जास्त उत्सुकता आहे ती म्हणजे केरळ राज्याची. डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या या राज्यावर यावेळी कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. टीव्ही 9- पोलस्ट्राट ( TV9-POLSTRAT Exit Poll 2021) च्या एक्झिट पोलनूसार यावेळी केरळवर डाव्या आघाडीचाच झेंडा फडकणार आहे. (Kerala Exit Poll Results 2021 Elections LIVE Updates in marathi TV9-POLSTRAT exit poll result LDF UDF BJP congress Pinarayi Vijayan)

यावेळी सत्ता कोणाची, टीव्ही 9 चा एक्झिट पोल काय सांगतो ?

केरळमध्ये विधानसभेच्या एकूण 140 जागांसाठी एका टप्प्यात मतदान झालं. मतदानाची ही प्रक्रिया 6 एप्रिल रोजी पार पडली. येत्या 2 मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. मात्र, हाती आलेल्या टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार यावेळी केरळमध्ये सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचं म्हणजेच LDF ला 70 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर UDF ला 59 ते 69 जागा मिळू शकतात. NDA ला 0 ते 2 जागा मिळतील. याठिकाणी बहुमतासाठी 71 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे.

सत्ता कोणाची ?

नुकत्याच हाती आलेल्या टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोल अंदाजानुसार केरळमध्ये यावर्षी पुन्हा डाव्या आघाडीची सत्ता येणार आहे. यावेळीसुद्धा भाजपला केरळमध्ये सत्तेपर्यंत जाता येणार नाही. मात्र, भाजपला यापेळी 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.

यावेळी कोणत्या पक्षाला किती जागा ?

LDF – 70 ते 80 जागा

UDF – 59 ते 69 जागा

NDA – 0 ते 2 जागा

एकूण – 140

2016 च्या निवडणुकीत काय चित्र होतं?

केरळमध्ये विधानसभेच्या एकूण 140 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 71 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2016 च्या निवडणुकीत एलडीएफने 83 जागांवर विजय मिळवला होता तर यूडीएफने 47 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे भाजपची मात्र पुरती धुळधाण झाली होती. 98 जागांपैकी फक्त एका जागेवर भाजपचा विजय झाला होता.

केरळचे सध्याचे मुख्यमंत्री कोण?

केरळच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी यशस्वीरित्या सांभाळला. केरळात सीपीआय (एम)च्या नेतृत्वाखाली लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचं म्हणजेच (एलडीएफ) चं सरकार आहे.

केरळमध्ये कोण कोणते प्रमुख पक्ष

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार केरळात 39 पक्ष निवडणूक लढवत आहेत. यामध्ये बसपा, भाजप, सीपीआय, सीपीआय (एम), इंडियन नॅशनल काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष तसंच प्रादेशिक पक्षाबाबत बोलायचं झाल्यास इंडियन युनियन मुस्लिम लिग, जनता दल, जनता दल सेक्युलर, केरळ काँग्रेस हे पक्ष आहेत.

केरळमधील पक्षीय बलाबल (2016)

CPI (M) -58 काँग्रेस -22 CPI – 19 IML – 18 IND-06 BJP-01 इतर – 16 एकूण जागा- 140

इतर बातम्या :

पीपीई किट, आरटीपीसीआर चाचणी सक्तीची, मतमोजणीसाठी पोलिंग एजंटांना निवडणूक आयोगाची गाईडलाईन

जामिन मिळून 10 दिवस उलटल्यानंतरही लालूंची तुरुंगातून सुटका नाही

अदार पुनावाला यांच्या जीवाला धोका? गृह मंत्रालयाने पुरवली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा

(Kerala Exit Poll Results 2021 Elections LIVE Updates in marathi TV9-POLSTRAT exit poll result LDF UDF BJP congress Pinarayi Vijayan)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.