शिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली

महाराष्ट्रावर भगवा फडकेल पण तो भगवा उद्धव ठाकरे यांच्या एकट्याच्याच हातात असेल. |

शिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 7:11 PM

मुंबई: महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल यादृष्टीने शिवसैनिकांनी कामाला लागावे, असा आदेश देणाऱ्या उद्धव ठाकरे यांची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खिल्ली उडविली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा जरुर फडकेल. पण तो भगवा उद्धव ठाकरे यांच्या एकट्याच्याच हातात असेल, अशी खोचक टिप्पणी किरीट सोमय्या यांनी केली. शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यात हाडवैर सर्वश्रूत आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून किरीट सोमय्या यांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Kirit somaiya on Uddhav Thackeray statement of Shivsena’s one handed command in state)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पक्षाच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. रात्री 10 वाजता सुरु झालेली ही बैठक मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल यादृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश दिल्याचे समजते.

दरम्यान, यावेळी किरीट सोमय्या यांनी कंगना राणावत आणि बिग बॉस कार्यक्रमावरून सुरु असलेल्या वादावरही भाष्य केले. कंगना राणावत प्रकरणात मुंबई महानगरपालिकेने वकिलांच्या फी साठी लाखो रुपये खर्च केले. हा अजब कारभार आहे. तर बिग बॉस कार्यक्रमावरुन निर्माण झालेला वाद दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे. माझी पत्नी आणि सून मराठीच आहेत. अशा पद्धतीने मराठी भाषेचा अपमान करणे चूक असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या घोषणेचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही खोचक शैलीत समाचार घेतला. शिवसेनेचा भगवा फडकवा, हे भाषण 30 वर्षांपासून ऐकत आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. भाजपाला दूर ठेवण्यासाठी एकत्र आलात तर लोकांना चांगली फळं मिळताना दिसत आहेत, त्यामुळे त्याच दिशेने काम करा, असे शरद पवार यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार

(Kirit somaiya on Uddhav Thackeray statement of Shivsena’s one handed command in state)

Non Stop LIVE Update
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.