काँग्रेसच्या गडात कमळ फुलवले; वाचा कोण आहेत काशीराम पावरा?

धुळे जिल्ह्यातील आदिवासींचे तारणहार म्हणून आमदार काशीराम पावरा यांच्याकडे पाहिले जाते. (know all about kashiram pawara)

काँग्रेसच्या गडात कमळ फुलवले; वाचा कोण आहेत काशीराम पावरा?
kashiram pawara
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 6:55 PM

मुंबई: धुळे जिल्ह्यातील आदिवासींचे तारणहार म्हणून आमदार काशीराम पावरा यांच्याकडे पाहिले जाते. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देण्याचं काम त्यांनी केलं आहे. आजही ते आदिवासींच्या प्रश्नांवर लढत असतात. आधी काँग्रेसमध्ये असलेले पावरा आता भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या या राजकीय कारकिर्दीवर टाकलेला प्रकाश. (know all about kashiram pawara)

कोण आहेत काशीराम पावरा

काशीराम वेचान पावरा यांचा जन्म 15 एप्रिल 1966 मध्ये झाला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सुळे हे त्यांचं जन्म गाव. त्यांचं शिक्षण अवघं इयत्ता पाचवीपर्यंत झालं आहे. त्यांना पत्नी तीन मुले आणि एक मुलगी अशी चार अपत्ये आहेत. त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे.

ग्रामपंचायतीपासून सुरुवात

पावरा यांच्या राजकारणाला ग्रामपंचायतीपासून सुरुवात झाली. त्यांनी सुळे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून 15 वर्षे काम केलं. शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीत ते पाच वर्षे सदस्य होते. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी पाच वर्षे काम केलं आहे. शिरपूर पिपल्स को ऑपरेटिव्ह बँकेचे ते पाच वर्षे सदस्य होते. नंतर 2001मध्ये बँक समितीवर उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.

दांडगा लोकसंपर्क

पावरा यांचा धुळ्यातील लोकसंपर्क दांडगा आहे. मतदारसंघातील अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी केलेले आंदोलन, आदिवासींच्या प्रश्नांवर दिलेले लढे त्यामुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. वीज, आरोग्य, रस्ते आणि पाणी या प्रमुख विषयांवर त्यांनी अनेक आंदोलने केली. गरीब माणसाच्या उन्नतीसाठी ते नेहमीच कार्यरत असतात. लोकांच्या अडचणीत धावून जाणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच येथील मतदारांनी त्यांच्यावर तिसऱ्यांदा विश्वास टाकला आहे. अमरीश पटेल यांचे खंदे समर्थक, विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे.

असं मिळालं तिकीट

गेल्या 30 वर्षांपासून धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर माजी आमदार अमरीश पटेल यांचं वर्चस्व होतं. पटेल हे 1990 पासून ते 2004 पर्यंत सलग चार वेळा निवडून आले होते. त्यानंतर 2009मध्ये हा मतदारसंघ राखीव झाल्याने काँग्रेसने काशीराम पावरा यांना उमेदवारी दिली. त्यानंतर पावरा या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर सलद दोनदा निवडून आले.

काँग्रेसच्या गडाला सुरुंग

2019पर्यंत राज्यातीलच नव्हे तर शिरपूरमधील गणितं बदलल्याचं पावरा यांच्या लक्षात आलं. शिरपूरमध्ये भाजपची ताकद वाढल्याचं पाहून निवडणुकीच्या अवघ्या 20 दिवस आधी पावरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत पावरा यांची लढत काँग्रेसच्या रणजितसिंग पावरा यांच्या विरोधात झाली. यावेळी रणजितसिंग पावरा यांना अवघे 7 हजार 534 मते मिळाली. तर काशीराम पावरा यांना 1 लाख 20 हजार 403 मते मिळाली. पावरा यांनी काँग्रेसच्या गडात कमळ फुलवितानाच विजयाची हॅट्रीकही साधली आहे. (know all about kashiram pawara)

संबंधित बातम्या:

विद्यार्थीदशेत ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठात विजयी, चारवेळा आमदार; वाचा, कोण आहेत जयकुमार रावल?

युवा नेता ते राज्यमंत्री… वाचा, डॉ. विश्वजीत कदम यांचा राजकीय प्रवास

आठवेळा आमदार, तरीही साधी राहणीमान; जाणून घ्या कोण आहेत के. सी. पाडवी?

(know all about kashiram pawara)

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.