Shiv Sena: काय योगायोग? ज्यावर्षी शिवसेना-भाजपचं सरकार महाराष्ट्रात आलं, त्याच वर्षी एका जावयाकडून सासऱ्याचं अख्खं सरकार हायजॅक

Shiv Sena : एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर शिवसेनेने ठाणे जिल्ह्याची जबाबदारी दिली. शिंदेही ही जबाबदारी मेहनतीने पार पाडत आले आहेत.

Shiv Sena: काय योगायोग? ज्यावर्षी शिवसेना-भाजपचं सरकार महाराष्ट्रात आलं, त्याच वर्षी एका जावयाकडून सासऱ्याचं अख्खं सरकार हायजॅक
ज्यावर्षी शिवसेना-भाजपचं सरकार महाराष्ट्रात आलं, त्याच वर्षी एका जावयाकडून सासऱ्याचं अख्खं सरकार हायजॅकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 2:28 PM

हैदराबाद: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं (maha vikas aghadi) सरकार अल्पमतात आलं आहे. शिवसेनेच्याच (shivsena) आमदारांनी बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिंदे सारख्या विश्वासू सहकाऱ्याने उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना दगा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पण विश्वासू सहकाऱ्याने दगा देऊन सत्तेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अगदी इतिहासाची पानांवरील धूळ झाडली तरी त्यात अशा प्रकारचे अनेक दाखले मिळतील. अगदी राजेशाहीच्या काळातही दगा देण्याच्या घटना घडल्या आहेत. एवढेच नव्हे तर बाजूच्या राज्यातील आंध्रप्रदेशातही अशीच घटना घडली आहे. आंध्रात तर एका जावयाने थेट सासऱ्याला आस्मान दाखवत सत्ता बळकावली होती. विशेष म्हणजे त्याच वर्षी महाराष्ट्राती युतीचं सरकार आलं होतं. त्याही आधी महाराष्ट्रात शरद पवारांनी वसंतदादा पाटलांविरोधात बंड करून पुलोदचा प्रयोग केला होता.

महाराष्ट्रात काय घडलं?

एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर शिवसेनेने ठाणे जिल्ह्याची जबाबदारी दिली. शिंदेही ही जबाबदारी मेहनतीने पार पाडत आले आहेत. त्यामुळेच फडणवीसांच्या सरकारमध्ये शिंदे यांना मोठी जबाबदारी दिली होती. त्यानंतर आता मविआच्या सरकारमध्येही शिंदे यांना ठाकरेंनी मोठी जबाबदारी दिली. राज्याचा मुख्यमंत्री नेहमीच नगरविकास खातं स्वत:कडे ठेवतो. पण उद्धव ठाकरे यांनी हे खातं शिंदे यांना दिलं. यावरून शिंदे उद्धव ठाकरे यांच्या किती जवळचे आहेत हे दिसून येतं. पण भाजप सोबत युती करण्याच्या मुद्द्यावर शिंदे यांनी बंड केलं आहे. शिवसेनेच्या 39 आमदारांना घेऊन बंड केलं आहे. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. सर्वात विश्वासू सहकाऱ्याने बंड केल्याने हा वार शिवसेनेच्या अधिक जिव्हारी लागला आहे.

हे सुद्धा वाचा

चंद्राबाबूने काय केलं?

चंद्राबाबू नायडू यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रसपासून झाली. राजकारणात सक्रिय होण्यासाठी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं. ते संजय गांधींच्या अत्यंत जवळचे होते. 1978मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आहे. विजयी झाले. त्यानंतर त्यांनी तेलुगू सिनेमातील सुपरस्टार आणि टीडीपीचे संस्थापक एनटी रामाराव यांच्या कन्येशी विवाह केला. एनटी रामाराव यांनी तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. मात्र, 1 सप्टेंबर 1995मध्ये चंद्राबाबू नायडूंनी आपल्याच सासऱ्याविरोधात बंड पुकारलं. त्यांनी सासऱ्याला मुख्यमंत्रीपदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री बनले. विशेष म्हणजे त्याच वर्षी म्हणजे 1995मध्ये महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं होतं. शिवसेनेचे पहिले आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशींनी शपथ घेतली होती. तर उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी शपथ घेतली होती.

पवारांचं पुलोद

1978मध्ये देशात दोन बंड गाजले. एक म्हणजे चंद्राबाबू नायडूचं आणि दुसरं म्हणजे शरद पवार यांचं. ज्या वर्षी चंद्राबाबू नायडूंनी बंड पुकारलं, त्याच वर्षी शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या विरोधात बंड पुकारलं. 38 आमदारांना घेऊन पवारांनी बंड पुकारलं आणि पुलोदचं सरकार स्थापन केलं. पुलोदचा प्रयोग करून शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे आता शिंदे यांच्या रुपाने इतिहासाची पुनरावृत्ती होतेय की काय अशी चर्चा सुरू आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.