नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळणं पडलं महागात; ‘मविआ’च्या 29 जणांवर गुन्हा

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला व रस्ता अडवून धरल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळणं पडलं महागात; 'मविआ'च्या  29 जणांवर गुन्हा
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 3:07 PM

इचलकरंजी/कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली, त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांच्यावरील कारवाई जोपर्यंत मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असल्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काँग्रेसकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधातही आंदोलन पुकारले आहे. तर आता महाविकास आघाडीने राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आता तीव्र आंदोलन छेडले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्येही महाविकास आघाडीने आणि मित्र पक्षाने एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन पुकारले आहे.

यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यात आला. त्यामुळे इचलकरंजीमध्ये वातावरण तापले आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकपा या पक्षांतील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून पंतप्रधान नेरंद्र मोदी यांचा पुतळा जाळला होता.

त्यामुळे आता शहरातील महाविकास आघाडीच्या 29 जणांवर गाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला व रस्ता अडवून धरल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांच्या खासदारकी गेल्यामुळे केले इचलकरंजीतील केएलकेएल चौकामध्ये निदर्शने करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकपा अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.