Lalita Tarakh: तुम्हाला पण आई-बहीण…ललिता तारख यांची थेट पोलिसांत धाव, मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ?

Lalita Tarakh Police Complaint: मराठा आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ती ललिता तारख यांनी दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना सुनावले आणि त्यानंतर आता त्यांनी थेट जालना जिल्ह्यातील अंबड पोलीस स्टेशन गाठले आहे. पोलिसांकडे त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

Lalita Tarakh: तुम्हाला पण आई-बहीण...ललिता तारख यांची थेट पोलिसांत धाव, मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ?
ललिता तारख, मनोज जरांगे पाटील
| Updated on: Sep 29, 2026 | 12:11 PM

मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनी जालना जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अंबड पोलीस ठाण्यात ललिता तारख यांनी ही तक्रार दिली. सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. AI निर्मित अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून बदनामी केल्याचा आणि धमक्या दिल्याचाही तक्रारीत उल्लेख केला आहे. धमक्या देणाऱ्यांवर आणि बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि 2023 पासून माझ्यासह सर्वांच्या संपत्तीची चौकशी करण्याची ललिता तारख यांनी मागणी केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच जरांगेंविरोधात वक्तव्य

Loading...

जरांगे यांनी आमच्या गावाला खोटं आश्वासन देऊन फसवले. जरांगे यांच्या उपोषणाची मी साक्षीदार तुम्ही कसे उपोषण केलं हे मी वेळ आल्यावर सांगेन.भावनिक करून महिलांचा वापर केला, असा गंभीर आरोप जरांगे यांच्यावर तारख यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आपल्याला अश्लील संदेश आणि शिवीगाळ सुरू झाल्याचा आरोप ललिता तारख यांनी केला. त्यांचा रोख मनोज जरांगे समर्थकांवर आहे. त्यामुळे आता याप्रकरणात मनोज जरांगे काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांनी दोषींविरोधात कारवाई करावी

इतक्या दिवसांपासून जरांगे यांच्या बाजूने बोलत होते, तेव्हा चांगले होते. आज सत्य बोलले तर समजून घ्या. तुमच्या घरी आई-बहीण आहे हे कमेंट करताना भान ठेवा. पोलिसांनी याप्रकरणी दोषींविरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ललिता तारख यांनी केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनाही साकडं घातलं आहे. सोशल मीडियावर नाहक बदनामी करण्यात येत आहे. मी किती पैसे घेतले, मला किती लाखांचे पॅकेज आले, तुम्ही प्लॉट घेतला का, असे प्रश्न मला अनेकजण विचारत आहेत. 2023 पासून माझ्या आणि त्यांच्या संपत्तीची चौकशी करा. म्हणजे कोणाच्या संपत्तीत वाढ झाली हे समोर येईल अशी मागणी तारख यांनी केली.

अंतरवाली सराटीत महत्वाची ग्रामसभा होणार

जालना अंतरवाली सराटीत महत्वाची ग्रामसभा होणार आहे. जरांगे पाटलांचे अंतरवालीतील आंदोलन संपल्यानंतर ग्रामसभा होत असल्याने महत्त्व आले आहे. ग्रामसेवक, सरपंच कौशल्याबाई तारख, काही सदस्य आणि काही ग्रामस्थ दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ग्रामसभेला सुरुवात होणार आहे. गावातील महत्त्वाच्या ११ मुद्द्यांवर ग्रामसभा होईल. ऐनवेळी जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत सुध्दा चर्चा होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us