AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ujjwal Nikam | मैदान सोडू नका, कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी ठाकरे गटाला काय आशा दाखवली? Video

Ujjwal Nikam | शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी आपल मत मांडलय. ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात चांगला युक्तीवाद करता येऊ शकतो असं त्यांनी म्हटलय. निकालात प्रतोदपदाच्या महत्वाच्या मुद्याकडे त्यांनी लक्ष वेधलय.

Ujjwal Nikam | मैदान सोडू नका, कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी ठाकरे गटाला काय आशा दाखवली? Video
Ujjwal Nikam
| Updated on: Jan 11, 2024 | 8:22 AM
Share

Ujjwal Nikam | शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी निकाल दिला. हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार पात्र ठरले. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा एक मोठा झटका आहे. त्यांच्यासाठी दिलासा देणारी एकमेव बाब म्हणजे ठाकरे गटाचेही 15 आमदार पात्र ठरले आहेत. राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देताना शिवसेनेची 1999 सालची घटना ग्राह्य धरली. महत्त्वाच म्हणजे राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या भरत गोगावले यांची प्रतोपदी नियुक्ती वैध ठरवली. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निकाल देताना भरत गोगावले यांची प्रतोपदी नियुक्ती अवैध ठरवली होती. हा निर्णय अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बदलला. एकूणच या विषयात अनेक पेचात टाकणारे मुद्दे होते. महाराष्ट्र विधिमंडळातील या निकालाकडे सगळ्या देशाच लक्ष लागल होतं. कारण भविष्यात अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्या राज्यात उद्भवल्यास हा निकाल मार्गदर्शक ठरणार आहे.

दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या या निकालावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी आपल मत मांडलय. त्यांनी ठाकरे गटाला, सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडता येईल, अशी आशा दाखवलीय. “आमदारांच्या अपात्रतेबद्दल 10 व परिष्ट याच्याशी अध्यक्षांनी सांगड घालण्याचा प्रयत्न केलाय. महत्त्वाची बाब म्हणजे अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांचा व्हीप ग्राह्य धरला होता आणि भरत गोगावले यांचा ग्राह्य धरला नव्हता. अध्यक्षांनी निकालपत्रात सकृतदर्शनी दोन्ही व्हीप ग्राहय धरल्याचत दिसतय. दोन्ही व्हीप ग्राह्य धरण्याला आधार काय? हे संपूर्ण निकालपत्राच वाचन केल्यानंतरच समजेल” असं उज्वल निकम म्हणाले.

‘अध्यक्षांनी त्या निर्णयाला हरताळ फासलाय का?’

“निश्चित ठाकरे गटाला याबाबतीत चांगला युक्तीवाद करता येऊ शकतो. व्हीपचा मुद्दा ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायलयाच्या घटनापीठाने निकालात प्रतोदपदाबद्दल महत्त्वाच निरीक्षण नोंदवल होतं. अध्यक्षांनी त्या निर्णयाला हरताळ फासलाय का? हे तपासाव लागेल” असं उज्वल निकम म्हणाले. पक्षप्रमुख ही संकल्पनाच घटनेत नाही, हे अध्यक्षांनी विधान केलय. त्यासाठी त्यांनी कुठल्या गोष्टीचा आधार घेतला आहे? आधार नसल्यास ते ठाकरे गटाला सिद्ध कराव लागेल असं उज्वल निकम म्हणाले.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.