मतदान LIVE : राज्यातील 14 जागांसाठी मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांचा समावेश आहे. या जागांसाठी मंगळवारी 23 एप्रिलला मतदान होत आहे. सर्वात तुल्यबळ लढती म्हणून या टप्प्याकडे पाहिलं जात आहे. 14 मतदारसंघात तब्बल 249 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या टप्प्यात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. तिसऱ्या टप्प्यात 249 उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवार […]

मतदान LIVE : राज्यातील 14 जागांसाठी मतदान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांचा समावेश आहे. या जागांसाठी मंगळवारी 23 एप्रिलला मतदान होत आहे. सर्वात तुल्यबळ लढती म्हणून या टप्प्याकडे पाहिलं जात आहे. 14 मतदारसंघात तब्बल 249 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या टप्प्यात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

तिसऱ्या टप्प्यात 249 उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवार असून बारामती मतदार संघात सर्वाधिक चार महिला उमेदवार आहेत. तर पुणे आणि माढा मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी 31 उमेदवार असून सर्वात कमी  09 उमेदवार हे सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत. याशिवाय जळगाव (14), रावेर (12), जालना (20), औरंगाबाद (23),रायगड (16), बारामती (18), अहमदनगर (19), सांगली (12), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (12), कोल्हापूर (15) आणि हातकणंगले (17) उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

या टप्प्यासाठी 56 हजार 025 बॅलेट युनिट तर 35 हजार 562 कंट्रोल युनिट देण्यात आली आहेत. तसेच 37 हजार 524 व्हीव्हीपॅट यंत्रे सुद्धा या चौदा मतदार संघात देण्यात आली आहेत.  या टप्यातील प्रक्रियेसाठी एकूण 1 लाख 41 हजार 113 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, 17 हजार 192 कर्मचाऱ्यांना राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे.  तिसऱ्या टप्प्यात या मतदारसंघात एकूण 1 कोटी 33 लाख 19 हजार 10 पुरुष तर 1 कोटी 24 लाख 70 हजार 76 महिला आणि 652 इतर नागरिक मतदान करणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील मतदार संघ, त्यातील मतदान केंद्रे, कंसात एकूण मतदार संख्या पुढीलप्रमाणे –

मतदान होणारे मतदार संघ : जळगाव – 2013 मतदान केंद्रे (एकूण मतदार 19 लाख 25 हजार 352), रावेर – 1906 मतदान केंद्रे (17 लाख 73 हजार 107), जालना– 2058 मतदान केंद्रे (18 लाख 65 हजार 20), औरंगाबाद – 2021 मतदान केंद्रे (18 लाख 84 हजार 865), रायगड – 2179 मतदान केंद्रे (16 लाख 51 हजार 560), पुणे –1997 मतदान केंद्रे (20 लाख 74 हजार 861), बारामती – 2372 मतदान केंद्रे (21 लाख 12 हजार 408), अहमदनगर – 2030 मतदान केंद्रे (18 लाख 54 हजार 248), माढा – 2025 मतदान केंद्रे (19 लाख 4 हजार 845), सांगली – 1848 (18 लाख 3 हजार 53), सातारा – 2296 मतदान केंद्रे (18 लाख 38 हजार 987), रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 1942 मतदान केंद्रे (14 लाख 54 हजार 524), कोल्हापूर – 2148 (18 लाख 74 हजार 345), हातकणंगले – 1856 (17 लाख 72 हजार 563).

मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

मतदानासाठी आवश्यक 11 दस्तावेज

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.