महाविकास आघाडी सरकारनं शब्द पूर्ण केला नाही, सांगोल्याच्या फेमस आमदाराची बीडमधून टीका

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन बंड केल्याचा आरोप त्यांच्यावर कायम केला जात आहे. पण आता सत्ता स्थापन झाल्यानंतर शहाजी बापू या बंडा दरम्यानचे वास्तव सांगितले आहे. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला नेले नाहीतर आम्हीच त्यांना घेऊन गेल्याचे सांगितले.

महाविकास आघाडी सरकारनं शब्द पूर्ण केला नाही, सांगोल्याच्या फेमस आमदाराची बीडमधून टीका
आ. शहाजीबापू पाटीलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 5:39 PM

बीड :  (Maharashtra) राज्यात सत्तांतर होऊन आता तीन महिने होत आहेत. मात्र त्यानंतरही (Shivsena) शिवसेनेतील बंड आणि ही वेळ का आली याचे स्पष्टीकरण शिंदे गटातील आमदारांकडून दिले जात आहे. यापूर्वी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांनी मविआ सरकारच्या काळात निधी मिळत नसल्याचे कारण दिले होते. आता शिवसेनेचे अस्तित्व आणि भविष्य याबाबतही (Shahaji Bapu Patil) शहाजीबापूंनी आपवे मत व्यक्त केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभाग झाला तेव्हापासूनच शिवसेना खऱ्या अर्थाने संपायला सुरवात झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर आगामी लोकसभा निवडणूकीपर्यंत हा पक्ष संपूर्णरित्या कमकुवत होईल असेही विधान त्यांनी बीडमध्ये केले आहे.

जनतेला आश्वासने दिली, पूर्ततेचे काय?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी वाटपात कायम दुजाभाव झाला होता. मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानाही याच पक्षातील आमदारांची कोंडी झाली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मतदार संघात विकास कामांचा झपाटा सुरु होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची सत्ता असूनही निवडणूकांच्या दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता आली नसल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

काय असणार शिवसेनेचे भवितव्य?

गेल्या अडीच वर्षात तशी शिवसेना संपतच होती. आता तर गळती रोखता येत नसल्याने पडझड ही सरुच आहे. सध्या कोणत्या निवडणूका नाहीत तरी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ कायम आहे. त्यामुळे आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांपर्यंत हा पक्ष कमकुवत होईल असा विश्वास शहाजीबापूंनी व्यक्त केला.

आता नाही तर कधीच नाही?

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन बंड केल्याचा आरोप त्यांच्यावर कायम केला जात आहे. पण आता सत्ता स्थापन झाल्यानंतर शहाजी बापू या बंडा दरम्यानचे वास्तव सांगितले आहे. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला नेले नाहीतर आम्हीच त्यांना घेऊन गेल्याचे सांगितले. कारण आता हे पाऊल उचलले नाही तर शिवसेना शिल्लक राहणार नसल्याचा आग्रह धरल्यानेच हे पाऊल उचलले असल्याचे बापूंनी स्पष्ट केले आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.