LIVE : आम्ही 162, सर्वांचं एकत्र फोटोसेशन, महाविकासआघाडीची एकजूट

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकूण 162 आमदारांचे एकत्र फोटो सेशन आणि ओळख परेड करण्यात येणार Maha Vikas Aghadi We are 162) आहे.

LIVE : आम्ही 162, सर्वांचं एकत्र फोटोसेशन, महाविकासआघाडीची एकजूट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ (Maha Vikas Aghadi We are 162) घेतली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने भाजपच्या सत्तास्थापनेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयाचे दारं ठोठावली (Maha Vikas Aghadi We are 162) आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकूण 162 आमदारांचे एकत्र फोटो सेशन आणि ओळख परेड करण्यात येणार (Maha Vikas Aghadi We are 162) आहे. यानिमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

LIVE UPDATE : 

[svt-event title=”सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते 162 आमदार उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात” date=”25/11/2019,7:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आपण 162 नाही, त्यापेक्षाही जास्त : अशोक चव्हाण” date=”25/11/2019,7:43PM” class=”svt-cd-green” ] we are not 162, we are more than 162 म्हणजेच आम्ही 162 नाही, तर त्यापेक्षाही जास्त असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले [/svt-event]

[svt-event title=”शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते ग्रँड हयातमध्ये” date=”25/11/2019,7:39PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे ग्रँड हयातमध्ये दाखल, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे ग्रँड हयातमध्ये, त्याशिवाय काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, मल्लिकाअर्जुन खर्गे हयातमध्ये दाखल

[/svt-event]

[svt-event title=”आम्ही 162, महाविकासआघाडीची एकजूट” date=”25/11/2019,7:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आदित्य ठाकरे आणि रोहित पवार ग्रँड हयातमध्ये दाखल” date=”25/11/2019,7:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ग्रँड हयातमध्ये रवाना” date=”25/11/2019,7:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे ग्रँड हयातमध्ये दाखल” date=”25/11/2019,7:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे ग्रँड हयातच्या दिशेने रवाना” date=”25/11/2019,7:06PM” class=”svt-cd-green” ] उद्धव ठाकरे ग्रँड हयातच्या दिशेने रवाना झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”तिन्ही पक्षांचे 162 आमदार पहिल्यांदा एकत्र येणार” date=”25/11/2019,7:06PM” class=”svt-cd-green” ] महाविकासआघाडीच्या फोटोसेशनसाठी पहिल्यांदाचा तिन्ही पक्षांचे 162 आमदार एकत्र येणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेचे आमदार ग्रँड हयातमध्ये पोहोचले” date=”25/11/2019,6:57PM” class=”svt-cd-green” ] महाविकासआघाडीच्या आमदारांच्या फोटोसेशनसाठी शिवसेनेचे आमदार ग्रँड हयातमध्ये दाखल झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”शरद पवार, सुप्रिया सुळे ग्रँड हयात हॉटेलमध्ये दाखल” date=”25/11/2019,6:56PM” class=”svt-cd-green” ] 162 आमदारांच्या ओळख परेडसाठी शरद पवार, सुप्रिया सुळे ग्रँड हयात हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”ग्रँड हयातमध्ये फोटो सेशन आणि ओळख परेडची सर्व तयारी पूर्ण” date=”25/11/2019,6:52PM” class=”svt-cd-green” ] ग्रँड हयातमध्ये फोटो सेशन ओळख परेडची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. हॉटेलमध्ये स्क्रिनवर WE ARE 162 असे लिहिले आहे. [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे सर्व आमदार ग्रँड हयातच्या तळमजल्यावर दाखल” date=”25/11/2019,6:51PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे सर्व आमदार ग्रँड हयातच्या तळमजल्यावर दाखल झाले आहे. [/svt-event]

[svt-event title=”ग्रँड हयात मध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात” date=”25/11/2019,6:50PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार एकत्रित येणार असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला आहे. [/svt-event]

[svt-event title=”शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार ग्रँड हयातच्या दिशेने रवाना” date=”25/11/2019,6:35PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसचे सर्व आमदार जे.डब्ल्यू मॅरीएटमधून ग्रँड हयात कडे येण्यास रवाना झाले आहेत. तर शिवसेनेचे आमदार लेमन ट्री हॉटेलमधून रवाना झाले आहे. [/svt-event]

सांताक्रुझच्या ग्रँड हयात हॉटेलच्या तळमजल्यावरील बॉल रुममध्ये हे फोटो सेशन होणार आहे. यावेळी ओळख परेडही होणार आहेत. संध्याकाळी 7 च्या दरम्यान ही ओळख परेड होणार आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी “आम्ही सर्व एक आहोत आणि एकत्र आहोत. आमच्या 162 आमदारांना या आणि एकत्र बघा,” असे टविट केले आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी हे ट्विट राज्यपालांना टॅग केले आहे.

दरम्यान या ओळख परेड आणि फोटोसेशनसाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे हे ग्रँड हयात मध्ये उपस्थित असणार आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यासारखे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सर्व ओळख परेड आणि फोटो सेशनची पाहणी विनायक राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी केली Maha Vikas Aghadi We are 162) आहे.

महाविकासआघाडीतर्फे आमदार फुटू नयेत यासाठी वारंवार काळजी घेतली जात आहे. त्यासाठी शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना लेमन ट्री हॉटेलमध्ये ठेवलं आहे. तर काँग्रेसचे सर्व आमदार जे.डब्ल्यू. मॅरीएट हॉटेलमध्ये आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार ग्रँड हयात हॉटेलमध्ये आहेत.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI