सरकार येणार तर भाजपचंच : चंद्रकांत पाटील

"भाजपचे नेतृत्व असलेले सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल," असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त (Chandrakant Patil Press Conference) केला.

सरकार येणार तर भाजपचंच : चंद्रकांत पाटील

मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच नुकतंच भाजपच्या चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले (Chandrakant Patil Press Conference) होते. या बैठकीनंतर भाजपची पत्रकार परिषद झाली. यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी माहिती (Chandrakant Patil Press Conference) दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजपचे 105 आमदार निवडून आले आहेत. तर 14 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे 105+14 अशी मिळून भाजपची एकत्रित 119 संख्या येते आणि त्यामुळे भाजपला घेतल्याशिवाय राज्यात सरकार स्थापन होऊ शकत (Chandrakant Patil Press Conference) नाही.”

भाजपच्या या चिंतन बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांसह भाजपचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत “भाजपचे नेतृत्व असलेले सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त (Chandrakant Patil Press Conference) केला.

“भाजपच्या आतापर्यंत 3 बैठका झाल्या. या तिन्ही बैठकीत काल विधानसभेत निवडून आलेले आमदार, अपक्ष आमदार आणि विधानपरिषदेतील आमदार यांची चर्चा झाली. त्यानतंर आज नव्याने लागणाऱ्या संघटनात्मक रचनेचे प्लॅनिंग झाले. तर दुपारनंतर राज्यातील नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी प्रामुख्याने राजकीय परिस्थितीचे विश्लेषण झाले,” अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप हा राज्यात नंबर एक वर असणार पक्ष कशाप्रकारे आहे, याबाबतची माहिती देण्यात आली. “नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला पहिल्या क्रमांकाची एकूण 1 कोटी 42 लाख मतं मिळाली आहेत. त्यानंतर 92 लाख दुसऱ्या क्रमांकाची मत राष्ट्रवादीला, तर 90 लाख मतं शिवसेनेला मिळाली आहे,” असेही त्यांनी सांगितले.

“गेल्या निवडणुकांमध्ये भाजपने 260 जागा लढवून 122 जिंकल्या होत्या. तर यावेळी 164 जागा लढवून 105 जागा जिंकल्या. हे गुणोत्तर अधिक आहेत. यात सर्वाधिक 12 महिला आमदार भाजपच्या निवडून आल्या आहे. तर भाजपचे अनुसूचित जातीचे 9 आमदार आणि अनुसूचित जमातीचे 9 आमदार निवडून आले आहेत,” अशीही माहिती चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil Press Conference) दिली.

“यंदाच्या निवडणुकीत हरलेल्या 59 जागांपैकी 55 जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकाची मतं घेणारा पक्ष आहेत. तर 26 आयारामांमधील 16 आयाराम विजयी झाले आहेत,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

“जर वेगवेगळ्या शीर्षकाखाली माहिती घेतली तर 90 नंतर एकाही पक्षाला जास्त जागा मिळवता आल्या नाहीत. 2014 आणि 2019 ला सर्वाधिक जागा भाजपच्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीलाही 100 चा आकडा पार करता आला नाही,” असेही ते यावेळी (Chandrakant Patil Press Conference) म्हणाले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI