
महाराष्ट्रातील कोकण प्रांत म्हणजे निसर्गाने समृद्ध असलेला प्रदेश. निसर्गाने कोकणाला भरभरुन दिलय. अलिबागपासून सुरु होणाऱ्या कोकणाच सौंदर्य पहिल्या नजरेतच तुम्हाला प्रेमात पाडतं. एकाबाजूला निळाशार अंथाग पसरलेला समुद्र आणि दुसऱ्याबाजूला पश्चिम घाटातील डोंगर रांगा. कोकणाच हेच सौंदर्य पाहून आतापर्यंत अनेकदा कोकणचा कॅलिफोर्निया करणार असं म्हटलं गेलय. अलिबागपासून सुरु होणाऱ्या कोकणाच टोक म्हणजे सावंतवाडी. त्यानंतर सुरु होते ती गोव्याची सीमा. कोकणाची आणखी एक ओळख म्हणजे हापूस आंबा. खासकरुन रत्नागिरी-देवगडच्या हापूस आंब्याच आज जगात स्वत:च एक वेगळ स्थान आहे. पूर्वी कोकणी माणसाच उपजिवीकेच मुख्य साधन होतं, शेती आणि मासेमारी. पण आज कोकणी माणूस अन्य क्षेत्रात सुद्धा तितकाच यशस्वी आहे. अनेक फळ प्रक्रिया, बागायती उद्योग कोकणात स्थिरावले आहेत. कुठेही कोकणाच्या राजकारणाचा विषय निघाला की, ती चर्चा राणे या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा नारायण राणेंचा बालेकिल्ला. राणेंच्या राजकारणावर लिहिण्याआधी थोडा कोकणचा...