AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात खळबळ! बड्या नेत्याचे मंत्रिपद जाणार? राष्ट्रवादीकडून जुन्यांसह या नव्या चेहऱ्यांना संधी

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी धनंजय मुंढे यांच्यासह सुनील शेळके आणि राजू नवघरे यांचा मंत्रि‍पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

राजकारणात खळबळ! बड्या नेत्याचे मंत्रिपद जाणार? राष्ट्रवादीकडून जुन्यांसह या नव्या चेहऱ्यांना संधी
Maharashtra Cabinet ReshuffleImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 14, 2026 | 5:43 PM
Share

गेल्या काही काळापासून राज्यासह केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी धनंजय मुंढे यांच्यासह सुनील शेळके आणि राजू नवघरे यांचा मंत्रि‍पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे आणि सुनील शेळके यांची कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातून राजू नवघरे यांनाही मंत्रि‍पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तर मंत्री नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. झिरवळ यांच्यासह इतरही काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंढे मंत्रिमंडळात परतणार

धनंजय मुंढे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये मुंढे यांची वर्णी लागली होती, मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, मात्र आता त्यांचा समावेश पुन्हा एकदा मंत्रिमंडळात केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातून आमदार सुनील शेळके यांचे देखील नाव मंत्रि‍पदासाठी चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. या दोघांना कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाऊ शकते. तर विदर्भातून आमदार राजू नवघरे यांनाही मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे नरहरी झिरवळ यांच्यासह अनेक काही मंत्र्यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. झिरवळ हे दोन प्रकरणांमध्ये चर्चेत आले होते, त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप