AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death in Plane Crash : मोठी बातमी! अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

Ajit Pawar Death in Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. मुंबईहून बारातमीकडे विमानाने सकाळीच अजित पवार निघाले होते.

Ajit Pawar Death in Plane Crash : मोठी बातमी! अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू
Ajit Pawar Death in Plane Crash
| Updated on: Jan 28, 2026 | 10:15 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. हा विमान अपघात बारामतीत झाला. अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू या विमान अपघातात झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी बारामतीमध्ये सभा असल्याने अजित पवार हे मुंबईहून बारातमीकडे रवाना झाले होते. मात्र, लॅडिंगदरम्यान हा अपघात झाला. ज्यावेळी विमान जमिनीवर कोसळले, त्यावेळी विमानाला मोठी आग लागली. या अपघातानंतर लगेचच मदतकार्य राबवण्यात आले. पण अजित पवारांसह 6 जणांचा अपघातात मृत्यू झाला. या घटनेने राज्यात शोककळा पसरली आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी काम बघितले. राज्याच्या राजकारणातील मोठा चेहरा म्हणून अजित पवार यांच्याकडे बघितले जात होते. काका शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत मिळून अजित पवार यांनी सत्ता स्थापन केली होती.

अजित पवार यांचे विमान लॅंडिंगदरम्यान बारामती येथील शेतात कोसळले. सुरूवातील या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याचे सांगितले गेले. मात्र, त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगेचच बारामती विमानतळाकडे धाव घेतली. अपघाताच्या फोटो आणि व्हिडीओनंतर हे स्पष्ट झाले की, हा अपघात अत्यंत गंभीर आहे. अजित पवार यांच्यासोबत या विमानात त्यांचे पीए आणि काही बॉडीगार्डही होते.

बारामतीमध्ये सकाळी सभा असल्याने अजित पवार मुंबईहून भल्या पहाटे निघाले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर अजित पवार यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर लोकांना मोठा धक्का बसला असून कार्यकर्त्ये रडताना दिसत आहेत.

अजित पवार यांच्या विमानाचा अपघातात ज्याठिकाणी झाला, त्याठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांच्या मृत्यूने राज्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने बारामतीकडे सध्या धाव घेत आहेत. या अपघाताबद्दल सध्या तपास केला जात आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?