AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गाडीखाली श्वान आला तरी, ते…’ अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Abhishek Ghosalkar | विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय, त्यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. "गोळीबाराची घटना गंभीर आहे. मात्र त्याच राजकारण करणं योग्य नाही. या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्था संपलेली आहे, असं म्हणण चुकीच आहे"

'गाडीखाली श्वान आला तरी, ते...' अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
devendra fadnavis
| Updated on: Feb 09, 2024 | 11:38 AM
Share

मुंबई : “एका तरुण नेत्याच अशा पद्धतीने निधन व्हाव हे अतिशय गंभीर आहे. काही लोक या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे योग्य नाही” असं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अभिषेक घोसाळकर यांच्या निधनावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना गंभीर आहे, मात्र “गोळ्या घातल्या त्या मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे एकत्रित फोटो पहायला मिळालेत. वर्षानुवर्ष ते एकत्र काम करत होते. आता कुठल्या विषयावरुन बेबनाव झाला हे महत्त्वाच आहे, त्यांची चौकशी सुरु आहे. पोलीस तपासात वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. योग्यवेळी ती माहिती तुम्हाला दिली जाईल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“गोळीबाराची घटना गंभीर आहे. मात्र त्याच राजकारण करणं योग्य नाही. या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्था संपलेली आहे, असं म्हणण चुकीच आहे. कारण ही हत्या व्यक्तीगत वैमनस्यातून घडली आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “बंदुकांचे लायसन्स असतील, ही लायसन्स देताना काय खबरदारी घेतली पाहिजे? याचा विचार सरकार नक्कीच करेल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षांची सध्याची स्थिती अशी आहे की….

विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय, त्यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले की, “हे पूर्णपणे राजकीय आरोप आहेत. विरोधी पक्षांची सध्याची स्थिती अशी आहे की, एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी, ते राजीनामा मागतील. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराची घटना गंभीर आहे. त्यासाठी त्यांनी राजीनामा मागितला, तर मला आश्चर्य वाटत नाहीय. ही व्यक्तीगत वैमनस्यातून झालेली हत्या आहे. विरोधी पक्ष त्यांचं काम करतोय” असं देवंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच