मराठा आरक्षणावर जोर बैठका, चव्हाणांची ‘सह्याद्री’वर, तर भाजपची फडणवीसांच्या ‘सागर’वर बैठक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू झाली आहे. (maharashtra government and bjp organized meeting on maratha reservation)

मराठा आरक्षणावर जोर बैठका, चव्हाणांची 'सह्याद्री'वर, तर भाजपची फडणवीसांच्या 'सागर'वर बैठक
ashok chavan

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू झाली आहे. तर, मराठा आरक्षणावर पुढील दिशा ठरवण्यासाठी भाजपनेही महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या दोन्ही बैठकांमध्ये काय निर्णय होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (maharashtra government and bjp organized meeting on maratha reservation)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवलं आहे. त्यानंतर केंद्र सरकारने आरक्षणप्रश्नी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होत आहे. या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित आहेत. तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेही उपस्थित आहेत.

सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार?

मराठा आरक्षणाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. मराठा आरक्षणावरील कायदेशीर मार्गांचीही चाचपणी करण्यात येणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्याशिवाय नव्याने मागास वर्ग आयोग स्थापन करणे आणि डेडलाईनच्या आत मराठा समाजाच्या परिस्थितीचा अहवाल तयार करणे याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचीही बैठक

एककीकडे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू होत असतानाच भाजपनेही मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी ही बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पाटील, श्रीकांत भारतीय, गिरीश महाजन, राणा जगजितसिंह पाटील आणि प्रसाद लाडही उपस्थित आहेत. या बैठकीत मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या समितीतील सदस्यांच्या नावावरही आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने सुनावणीवेळी काय चुका केल्या, सरकारच्या कोणकोणत्या चुकांमुळे मराठा आरक्षण रद्द झालं, याचा अभ्यास ही समिती करणार असून या समितीच्या निष्कर्षावरून भाजप सरकारची पोलखोल करणार आहे. त्याशिवाय मराठा समाजाच्या आंदोलनातील सहभागाबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे भाजपच्या या बैठकीकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (maharashtra government and bjp organized meeting on maratha reservation)

 

संबंधित बातम्या:

Maratha Reservation | महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या; चंद्रकांत पाटलांचं केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्रं

केंद्राने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले, खतांची दरवाढ मागे घ्या; शरद पवारांचे सदानंद गौडांना पत्रं

(maharashtra government and bjp organized meeting on maratha reservation)