खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या; चंद्रकांत पाटलांचं केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्रं

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्राकडे खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे. (provide subsidy to farmers for purchasing fertilizer, chandrakant patil wrote to central)

खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या; चंद्रकांत पाटलांचं केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्रं
chandrakant patil
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 4:43 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्राकडे खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्रं लिहिलं आहे. खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी या पत्रातून केंद्राकडे केली आहे. (provide subsidy to farmers for purchasing fertilizer, chandrakant patil wrote to central)

चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि खते व रसायन मंत्री सदानंद गौड या दोघांनाही पत्रं लिहून ही मागणी केली. खत उत्पादक कंपन्यांनी गेल्या काही दिवसात खताच्या किंमतीत वाढ केली असून त्यामुळे पडणारा बोजा ध्यानात घेऊन शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी अनुदान द्यावे, असं पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.

शेतकरी संकटात

गेले वर्षभर कोरोना महामारी आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच खत उत्पादक कंपन्यांनी खताची किंमत वाढविल्यास शेतकऱ्यांसाठी अधिकच नुकसानकारक ठरेल. मान्सून काही दिवसांवर आला असून शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. हे ध्यानात घेता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी लवकरात लवकर अनुदान घोषित करावे, अशी मागणी करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रभावी निर्णय घेतले आहेत व योजना सुरू केल्या आहेत, याकडेही त्यांनी या दोन्ही मंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.

चहर यांना पत्रं

पाटील यांनी भाजपाचे किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर यांनाही पत्र पाठविले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान जाहीर करावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती पाटील यांनी चहर यांच्याकडे केली आहे.

पवार काय म्हणाले?

शरद पवार यांनीही खत आणि रसायन मंत्री सदानंद गौड यांना पत्रं लिहिलं होतं. त्यात त्यांनी खतांच्या किमतीत करण्यात आलेली वाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जनतेवर प्रचंड परिणाम झाला आहे. अनेकांचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. शेतकऱ्यांवरही या आजाराचा मोठा परिणाम झाला असून त्यांच्या अडचणी सोडवण्याची गरज आहे. मात्र, असं असताना शेतकऱ्यांना मदत करण्याचं सोडून सरकारने खतांच्या दरांमध्ये वाढ केल्याचं मी ऐकलं आहे. आधीच लॉकडाऊनमुळे बाजार पूर्णपणे कोलमडला आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. अशा वेळी केंद्राचा हा निर्णय थेट शेतकऱ्यांवर परिणाम करणारा आहे. एकीकडे इंधनाचे दर वाढत आहे. त्यात कोरोनाचं संकट आहे, असं असताना सरकारने खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे, असं पवारांनी पत्रात म्हटलं आहे. (provide subsidy to farmers for purchasing fertilizer, chandrakant patil wrote to central)

संबंधित बातम्या:

केंद्राने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले, खतांची दरवाढ मागे घ्या; शरद पवारांचे सदानंद गौडांना पत्रं

डीएपीच्या किमती कमी करा, यूरियासारखं इतर खतांवर सबसिडी द्या, दादा भुसेंचं केंद्राला पत्र

कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचा सल्ला

(provide subsidy to farmers for purchasing fertilizer, chandrakant patil wrote to central)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.