AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले, खतांची दरवाढ मागे घ्या; शरद पवारांचे सदानंद गौडांना पत्रं

केंद्र सरकारने खताच्या किमतीत वाढ केली आहे. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. (sharad pawar demands rollback of fertilizer price hike, wrote to center)

केंद्राने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले, खतांची दरवाढ मागे घ्या; शरद पवारांचे सदानंद गौडांना पत्रं
SHARAD PAWAR
| Updated on: May 18, 2021 | 3:39 PM
Share

मुंबई: केंद्र सरकारने खताच्या किमतीत वाढ केली आहे. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पवारांनी थेट केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे. (sharad pawar demands rollback of fertilizer price hike, wrote to center)

शरद पवार यांनी हे पत्रं ट्विटही केलं आहे. या पत्रातून पवारांनी सदानंद गौडा यांचं देशातील कोरोनाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांवरील संकटाची माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जनतेवर प्रचंड परिणाम झाला आहे. अनेकांचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. शेतकऱ्यांवरही या आजाराचा मोठा परिणाम झाला असून त्यांच्या अडचणी सोडवण्याची गरज आहे. मात्र, असं असताना शेतकऱ्यांना मदत करण्याचं सोडून सरकारने खतांच्या दरांमध्ये वाढ केल्याचं मी ऐकलं आहे. आधीच लॉकडाऊनमुळे बाजार पूर्णपणे कोलमडला आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. अशा वेळी केंद्राचा हा निर्णय थेट शेतकऱ्यांवर परिणाम करणारा आहे. एकीकडे इंधनाचे दर वाढत आहे. त्यात कोरोनाचं संकट आहे, असं असताना सरकारने खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे, असं पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

निर्णय धक्कादायक

दरवाढीचा हा निर्णय धक्कादायक आहे. त्याचा पुनर्विचार केला पाहिजे. तुम्ही यात वैयक्तिक लक्ष घालून लवकरात लवकर ही दरवाढ मागे घेतल्यास मला आनंदच होईल, असं सांगतानाच कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना अधिकाधिक दिलासा द्याल अशी आशा आहे, असंही त्यांनी शेवटी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या मुद्द्यावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने आता दुसरा धक्का देत खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केलं असून केंद्राच्या या धोरणाचा निषेध म्हणून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

दरवाढ मागे घ्या

पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीनंतर आता केंद्रसरकारने दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. 10.26.26 ची किंमत 600 रुपयांनी वाढली तर डीएफएची किंमत 715 ने वाढली आहे. डिएफए जी अगोदर 1185 रुपये किंमत होती ती आता 1900 रुपयांना मिळणार आहे. 10.26.26 च्या 50 किलोच्या पोत्याला 1175 ऐवजी 1775 रुपये मोजावे लागणार आहे. पोटॅशच्या किंमतीही वाढल्या आहेत, असेही त्यांनी सांगितलं. देशातील खतांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं पाप केंद्रातील भाजप सरकारने केलं आहे. राष्ट्रवादीतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्हयात शेतकऱ्यांवर वेगळया प्रकारचा बोजा लादला असून केंद्राने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांन केली आहे. (sharad pawar demands rollback of fertilizer price hike, wrote to center)

संबंधित बातम्या:

डीएपीच्या किमती कमी करा, यूरियासारखं इतर खतांवर सबसिडी द्या, दादा भुसेंचं केंद्राला पत्र

कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचा सल्ला

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीत वाढ; राष्ट्रवादीचा राज्यभर आंदोलनाचा इशारा

(sharad pawar demands rollback of fertilizer price hike, wrote to center)

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.