पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीत वाढ; राष्ट्रवादीचा राज्यभर आंदोलनाचा इशारा

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाल्याने या दरवाढी विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (Jayant Patil urges rollback of fertilizer price hike)

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीत वाढ; राष्ट्रवादीचा राज्यभर आंदोलनाचा इशारा
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 4:28 PM

मुंबई: पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाल्याने या दरवाढी विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खत दरवाढी विरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. (Jayant Patil urges rollback of fertilizer price hike)

जयंत पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने आता दुसरा धक्का देत खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केलं असून केंद्राच्या या धोरणाचा निषेध म्हणून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.

दरवाढ मागे घ्या

पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीनंतर आता केंद्रसरकारने दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. 10.26.26 ची किंमत 600 रुपयांनी वाढली तर डीएफएची किंमत 715 ने वाढली आहे. डिएफए जी अगोदर 1185 रुपये किंमत होती ती आता 1900 रुपयांना मिळणार आहे. 10.26.26 च्या 50 किलोच्या पोत्याला 1175 ऐवजी 1775 रुपये मोजावे लागणार आहे. पोटॅशच्या किंमतीही वाढल्या आहेत, असेही त्यांनी सांगितलं. देशातील खतांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं पाप केंद्रातील भाजप सरकारने केलं आहे. राष्ट्रवादीतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्हयात शेतकऱ्यांवर वेगळया प्रकारचा बोजा लादला असून केंद्राने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांन केली आहे.

डीएपीच्या किमती कमी करा

दरम्यान, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. डीएपी खतांची वाढलेली किंमत कमी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. डीएपी खतांच्या किमती वाढल्यानं शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. कृषीमंत्री दादा भूसे यांनी केंद्र शासनाला पत्र लिहून खतांच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे. ज्या प्रमाणे युरियाला सबसिडी देण्यात येते त्या प्रमाणे इतर खतांवर ही सबसिडी देण्याची मागणी ही दादा भूसे यांनी केंद्राकडे केली आहे.

दीड लाख मेट्रीक टन यूरीयाचा अतिरीक्त साठा

कृषी अधिकाऱ्यांनी वरीष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी. यंदा हवामान विभागाने मान्सून चांगला होईल असा अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खतांची मागणी एकाचवेळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेऊन यंद दीड लाख मेट्रीक टन युरीयाचा अतिरीक्त साठा करण्याचा निर्णय गेतला आहे. त्यासाठी विदर्भ विभागासाठी विदर्भ सहकारी पणन मंडळ आणि महाराष्ट्र कृषी औद्योगिक मंडळ या दोन यंत्रणांच्या सहकार्याने सर्व जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे, असंही दादा भुसे म्हणाले. (Jayant Patil urges rollback of fertilizer price hike)

संबंधित बातम्या:

डीएपीच्या किमती कमी करा, यूरियासारखं इतर खतांवर सबसिडी द्या, दादा भुसेंचं केंद्राला पत्र

कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचा सल्ला

पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार?

(Jayant Patil urges rollback of fertilizer price hike)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.