दर्जेदार दारु! धान्यापासून मद्यनिर्मितीचा राज्य सरकारचा निर्णय

धान्यापासून मद्यनिर्मिताला (Alcohol from grain) परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दर्जेदार दारु! धान्यापासून मद्यनिर्मितीचा राज्य सरकारचा निर्णय

नागपूर : राज्यात अनेक वर्षे गाजत असलेल्या धान्यापासून दारु (Alcohol from grain) निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. धान्यापासून मद्यनिर्मिताला (Alcohol from grain) परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता राज्यात लवकरच धान्यापासून निर्मित झालेली दारु उपलब्ध होणार आहे.

देशी दारुच्या निर्मितीसाठी अतिरिक्त असलेल्या धान्याचा वापर होणार आहे, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

ज्यांच्याकडे मद्य पिण्याचा परवाना आहे, त्यांना आता धान्यापासून तयार केलेली, चांगल्या दर्जाची देशी दारु मिळणार आहे. याशिवाय राज्यात ड्राय डे कमी करण्याची मागणी काही संस्थांनी केल्याचंही, बावनकुळे म्हणाले.

यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात धान्य आणि फळांपासून दारु निर्मितीचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी त्याविरोधात मोठं आंदोलन छेडण्यात आलं होतं. मात्र आता धान्यपासून दर्जेदार दारु निर्मिती करण्यात येईल, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याने, पुन्हा हा मुद्दा गाजण्याची चिन्हं आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI