AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारने लोकशाहीला कुलूप लावलं; प्रश्नोत्तरे, तारांकित प्रश्न नसल्याने विरोधी पक्षनेते फडणवीस आक्रमक

प्रश्नोत्तरे आणि तारांकित प्रश्न नसल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. | Devendra fadanvis Monsoon Session Live Updates

सरकारने लोकशाहीला कुलूप लावलं; प्रश्नोत्तरे, तारांकित प्रश्न नसल्याने विरोधी पक्षनेते फडणवीस आक्रमक
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 11:36 AM
Share

मुंबई :  प्रश्नोत्तरे आणि तारांकित प्रश्न नसल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “सरकारने लोकशाहीला कुलूप लावलंय, पण प्रश्नांना बगल देऊन लोकशाहीला कुलूप कसं लावता येईल? विरोधकांची सभागृहात मुस्कटदाबी होत असेल तर आम्ही जनतेत जाऊ”, असा आक्रमक पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. (Maharashtra Legislature Assembly And Council Two Days Monsoon session 2021 Devendra fadanvis Attacked thackeray Government)

आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. सकाळी दहाच्या सुमारास भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. थोड्या वेळानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्याचं विधिमंडळ परिसरात आगमन झालं. त्यावेळीही भाजप आमदारांनी जोरदार घोषणबाजी केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात एन्ट्री केली.

विरोधकांची सभागृहात मुस्कटदाबी होत असेल तर आम्ही जनतेत जाऊ

सभागृह सुरु होताच फडणवीसांनी आक्रमक पवित्रा घेत अधिवेशन दणाणून सोडणार असल्याचे संकेत दिले. सुरुवातीलाच त्यांनी सरकारचा समाचार घेतला. हे सरकार लोकशाहीला कुलूप पाहतंय.. प्रश्नांना बगल देऊन लोकशाहीला कुलूप कसं लावता येईल? विरोधकांची सभागृहात मुस्कटदाबी होत असेल तर आम्ही जनतेत जाऊ, असं फडणवीस म्हणाले.

सरकारला विरोधकांना बोलू द्यायचं आहे की नाही?, फडणवीसांचा सवाल

आम्हाला आजच्या दिवसाची कार्यक्रम पत्रिका दिली नाही. हे नेमकं काय चाललंय… सरकारला नेमकं काय करायचंय? आम्हाला बोलू द्यायचं आहे की नाही? सरकारने चर्चेला वेळ दिला नाही. पण हे असंच जर चालत राहिलं आणि विरोधकांची सभागृहात मुस्कटदाबी होत असेल तर आम्हाला जनतेत जाण्याशिवाय पर्याय नाही, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीसांचा भास्कर जाधव यांना टोला

फडणवीस बोलत असताना शिवसेना आमदार भास्कर जाधव व्यत्यय आणत होते. यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांना टोला लगावला. माझे जुने सहकारी भास्कर जाधव सध्या इतके अस्वस्थ असतात, त्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्री करावं… असं फडणवीस म्हणाले.

विरोधकांएवढेच सत्ताधारी आक्रमक

हरकतीचा मुद्दा मांडताना मुनगंटीवारांनी केलेल्या विधानावरुन सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. अनिल देशमुख असेच मध्ये बोलत होते… आता आत जात आहेत, असं मुनगंटीवार म्हणाले. मुनगंटीवारांच्या धमकीवरून सभागृहात गोंधळ झाला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री नवाब मलिक यांनी मुनगंटीवारांना प्रत्युत्तर दिलं. अध्यक्षांच्या मध्यस्तीनंतर सभागृहातला गोंधळ थांबला.

(Maharashtra Legislature Assembly And Council Two Days Monsoon session 2021 Devendra fadanvis Attacked thackeray Government)

हे ही वाचा :

Monsoon Session Live Updates | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विधिमंडळ परिसरात दाखल, भाजप आमदारांची जोरदार घोषणाबाजी

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.