कोरोनाबाबत शंका असेल तर कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात या, हसन मुश्रीफांचं विरोधकांना आव्हान

कोरोनाबाबत शंका असेल तर कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात या, हसन मुश्रीफांचं विरोधकांना आव्हान
हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री

अधिवेशन आलं की कोरोना होतो हा विरोधी पक्षाचा आरोप चुकीचा आहे. त्यांना जर एवढचं वाटतंय तर त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं, असं प्रत्युत्तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना दिलं आहे.

Akshay Adhav

|

Feb 26, 2021 | 12:24 PM

कोल्हापूर : अधिवेशन आलं की कोरोना होतो हा विरोधी पक्षाचा आरोप चुकीचा आहे. त्यांना जर एवढंच वाटतंय तर त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे. यावेळी विरोधकांनी कोरोनावरुन राजकारण करणं थांबवावं, असा सल्लाही त्यांनी दिला. (Maharashtra Minister Hasan Mushrif Slam Bjp over Corona And Budget Session)

ग्रामविकास मंत्री हसम मुश्रीफ यांनी टीव्ही 9 मराठीशी विविध विषयांवर संवाद साधला. संजय राठोड प्रकरण, महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तसंच ग्रामविकास विभागाचे कार्यक्रम यावरच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली.

कोरोनाबाबत शंका असेल तर कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात या

हे सरकार अधिवेशनापासून पळ काढण्याचं निमित्त शोधतंय. त्यामुळे अधिवेशन तोंडावर असताना यांनी कोरोनाची हूल उठवली. तसंच ऐन अधिवेशनाच्या तोंडावर संजय राठोड प्रकरण बाहेर आल्याने विरोधक याच प्रश्नावर अधिवेशनात कोंडी करतील, हे सत्ताधाऱ्यांना माहितीय, असा आरोप विरोधकांनी केला. त्यांच्या याच आरोपांना हसन मुश्रीफ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. “जर एवढचं वाटतंय तर विरोधकांनी त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं”, असं ते म्हणाले.

संजय राठोड प्रकरणी चौकशी सुरु, चौकशीशिवाय कारवाई चुकीची होईल

मुख्यमंत्री आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याच आधीच जाहीर केलंय. कोणत्याही चौकशी शिवाय कारवाई करणं चुकीचं होईल धनंजय मुंडे प्रकरणात भाजपची कशी फजिती झाली ते आपण पहिलं आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

संजय राठोड यांनी राजीनाम्यावर बोलताना मात्र मुश्रीफ यांनी सावध प्रतिक्रिया दिली. या बाबत मला अधिक माहिती नाही मात्र मुख्यमंत्री महोदयांच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असं म्हणत त्यांनी राजीनाम्यावर अधिक बोलणं टाळलं.

महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबवणार

8 मार्च ते 8 जून पर्यंत राज्यात महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या अंतर्गत बचत गटांना प्रोत्साहन देणार तसंच अमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मवर त्याच्या वस्तू विक्रीसाठी प्रयत्न असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

(Maharashtra Minister Hasan Mushrif Slam Bjp over Corona And Budget Session)

हे ही वाचा :

विदर्भात मंगलकार्यालयांवर वॉच, कार्यक्रमांना बंदी, सिनेमागृहे बंद होणार; विजय वडेट्टीवार यांचे संकेत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें