विधानसभा अध्यक्ष निवडणूक : काँग्रेसने आता नावही फोडलं? अध्यक्षपदासाठी पुण्यातील आमदार आघाडीवर

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : काँग्रेसने आता नावही फोडलं? अध्यक्षपदासाठी पुण्यातील आमदार आघाडीवर
विधानभवन

राज्याचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra assembly Monsoon session) येत्या पाच आणि सहा जुलैला होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची (Assembly Speaker Election) निवड होणार आहे.

सुनील काळे

| Edited By: सचिन पाटील

Jun 30, 2021 | 1:24 PM

मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra assembly Monsoon session) येत्या पाच आणि सहा जुलैला होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची (Assembly Speaker Election) निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितलं. (Maharashtra Monsoon session Assembly Speaker Election Congress MLA Sangram Thopte from Bhor Pune in race)

नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. मात्र विधानसभा अध्यक्षपद इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचं म्हणत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

संग्राम थोपटेंचं नाव आघाडीवर

अशावेळी काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी काही नावं शर्यतीत आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे संग्राम थोपटे. संग्राम थोपटे हे पुण्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. थोपटे आतापर्यंत भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने, संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनावर हल्ला केला होता. आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thopte) यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पुण्यातील काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली होती.

Sangram Thopte Congress MLA Bhor

Sangram Thopte Congress MLA Bhor

कोण आहेत संग्राम थोपटे?

संग्राम थोपटे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत

ते  पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात

संग्राम थोपटे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल अशी आशा त्यांना होती

मात्र मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस कार्यालयात तोडफोड केली होती

बाळासाहेब थोरात काय म्हणाले? 

बाळासाहेब थोरात म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. हे सरकार भक्कम आहे. दोन वर्षे सरकार चाललं आहे, पुढच्या काळातही सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत”

संबंधित बातम्या  

तीन वेळा आमदार झाल्याने मंत्रिपदाची इच्छा होती, पण… : संग्राम थोपटे

आमदार थोपटेंच्या कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यालयावर दगडफेक, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राडा

विधानसभा अध्यक्षांची निवड कधी, अध्यक्षपद कोणाकडे?, बाळासाहेब थोरातांनी कोंडी फोडली

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें